*क्रीडा स्पर्धेत भाग घेतल्यामुळे संघभावना निर्माण होते* *- अधिष्ठाता (कृषि) डॉ. उत्तम चव्हाण*

*क्रीडा स्पर्धेत भाग घेतल्यामुळे संघभावना निर्माण होते* *- अधिष्ठाता (कृषि) डॉ. उत्तम चव्हाण*

*राहुरी विद्यापीठ, दि. 30 जानेवारी, 2023*

 वेगवेगळे खेळ खेळतांना शरीराचा व्यायाम होतो व शरीरामध्ये प्राणवायु वाढतो. प्राणवायु वाढल्यामुळे शरीर तंदरुस्त राहते. क्रिडा स्पर्धेत भाग घेणार्या विद्यार्थ्यांचा एकमेकाशी संवाद साधला जातो, विचारांची देवाण घेवाण होते, यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो. व्यायाम केल्याने व क्रीडा स्पर्धेत भाग घेतल्याने शरीरामध्ये स्फुर्ती निर्माण होते, खिळाडूवृत्ती वाढते व संघ भावना निर्माण होते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषि) डॉ. उत्तम चव्हाण यांनी केले. 

 महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत विद्यापीठस्तरीय निम्नस्तर कृषि शिक्षण क्रीडा स्पर्धा 2022-23 च्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना अधिष्ठाता (कृषि) डॉ. उत्तम चव्हाण बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, सहयोगी अधिष्ठता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, सहयोगी अधिष्ठता (पम) डॉ. बापुसाहेब भाकरे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, हळगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहान, क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, काष्टी कृषि तंत्र निकेतनचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ शिंदे, कृषि तंत्र विद्यालयांचे प्राचार्य डॉ. राहुल देसले, डॉ. कुमार गुरव, डॉ. अविनाश गायकवाड, डॉ. मधुकर बेडीस, डॉ. मोहन शिर्के, डॉ. जे.डी. जाधव, डॉ. एस.के. कांबळे, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे, जनसंपर्क अधिकारी डॉ. गोकुळ वामन उपस्थित होते. 

 याप्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले विद्यार्थ्यानी खेळतांना खिळाडूवृत्ती जपावी, नियमांचे पालन करावे. विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहान यांनी विद्यार्थ्यांना गीत सादर करुन प्रबोधन केले. ते म्हणाले क्रीडा स्पर्धेत भाग घेतल्यांमुळे मुलांमध्ये निर्णयक्षमता वाढीस लागते. कोणताही निर्णय घेतांनी विचार करुन घ्या. येणार्या समस्यांवर मात करा. 

 या विद्यापीठस्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये खो-खो आणि हॉलीबॉल हे दोन क्रीडा प्रकार खेळले जाणार आहे. यामध्ये दहा जिल्ह्यातून खो-खोचे मुलांचे 8 संघ, मुलींचे 9 संघ आणि हॉलीबॉलमध्ये मुलांचे 9 संघ आणि मुलींचे 8 संघ असे एकुण 34 संघ्या सहभागी झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये 190 मुली व 142 मुले सहभागी झालेले आहे. प्रथम खेळाडूंचे संचालन झाले, संघनायंकांची ओळख परेड झाली, ध्वजारोहन करण्यात आले, महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पुजन करुन विद्यापीठ गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थी विकास धुळगंड यांनी खेळाडूंना शपथ दिली. या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यातून 450 विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राहुल खुळे यांनी केले तर आभार डॉ. जे.डी. जाधव यांनी मानले.