आंतरराष्ट्रीय महिला दिन-"भारतीय नारी, येणा-या उज्वल भविष्यासाठी लैंगिक समानता"- दिशा पिंकी शेख
श्रीरामपूर:-*BPS Live News...06 Shrirampur Reporter Prakash Nikale.* टिळकनगर येथील आनंद विहार मध्ये दि. १० मार्च २०२२ रोजी सिस्टर्स सुपिरियर सि. स्वेता यांचे नियोजनाने आंतरराष्ट्रीय महिला दिनी उपस्थित केंद्रीय प्रांतीय सिस्टर आम्रिता, रेव्ह. फा. मायकल, दिक्षा पिंकी शेख, उबाळे सर, छाया निकाळे मॅडम व या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश निकाळे या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन साजरा करण्यात आला. प्रसंगी महिलांनी व आनंद विहार मधील मुलींनी विविध नृत्य, संदेशपर नाटीका जेष्ट नागरिक आणि विविध महिला सबलीकरण गट यांचे समोर सादर केली. संतोष कोळगे टेलर यांनी महिलांसाठी स्व रचित गीत गायले. सोसायटी ऑफ द हेल्पर्स ऑफ मेरी 'आनंद विहार'च्या सिस्टर सुपिरियर व त्यांचे मदतनीस सर्व सिस्टर्स या ठिकाणी मुलींचे वस्तीगृह, महिला सबलीकरण, शिवण कला, युवक मुक्ती, वृध्द विधवा महिलागट, बाल संसद, जेष्ट नागरिक, दिव्यांग सक्षमीकरण, तुरुंग बंदिस्त सक्षमीकरण आणि तृतीय पंथीय सक्षमीकरण करण्याचे महान कार्य करत आहेत. याप्रसंगी महीलांना मार्गदर्शन, जागृती व सक्षम होण्यासाठी तृतीय पंथीय गुरु यांचे सहाय्यक दिशा पिंकी शेख यांनी "येणाऱ्या उज्वल भविष्यासाठी लैंगिक समानता" या वर्षाची महिला दिनाची थिम यावर अगदी सोप्या भाषेत रोक ठोक स्पष्ट उद्बोधक भाषण केले.सि.स्वेता यांनी दिशा ताई यांना याप्रसंगी प्रवक्त्या बोलावून ख-या अर्थाने या वर्षाची महिला दिनाची थिम प्रत्ययास आलेली दिसली. प्रकाश निकाळे, रेव्ह. फा. मायकल, सिस्टर आम्रिता, सरपंच दत्तनगर सुनिल शिरसाठ, बाबासाहेब दिघेसाहेब ( जिल्हा परिषद अहमदनगर बांधकाम समिती सभापती ) व प्रेमचंद कुंकलोळ यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सौ. कल्पना माघाडे आणि अनिता पठारे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन केले. सिस्टर सुपिरियर श्वेता यांनी प्रमुख अतिथी व उपस्थितांचे आभार मानले, राष्ट्रगीताने या कार्यक्रमची सांगता होवून एकमेकांस शुभेच्छा देत एकत्रीत प्रितीभोजनाचा आस्वाद घेतला. *BPS Live News...06 Shrirampur Reporter Prakash Nikale.*