केशव गोविंद बनात लहान मुलांना टाळाच्या किनकिनाटात हरिपाठाचे शिक्षण

केशव गोविंद बनात लहान मुलांना टाळाच्या किनकिनाटात हरिपाठाचे शिक्षण

बेलापूर खु॥ येथील केशव गोविंद बनात केशव गोविंद संस्थानच्या वतीने बाल संस्कारासाठी हरिपाठ आणी टाळ पखवादाचे प्रशिक्षणाचा उपक्रम दि १ मे पासुन ३० मे पर्यंत आयोजीत करण्यात आला आहे . हभप बाबानंद महाराज वीर यांच्या मार्गदर्शनात व  हभप कू-हे महाराज ,ज्ञानदेव पुजारी , बापूसाहेब बडधे , इत्यादि भाविकांच्या सहकार्यात सुमारे २५ मुलांनी पहिल्याच दिवशी या उपक्रमात भाग घेतला . उन्हाळ्याच्या सुटट्यांचा सदूपयोग व्हावा आणी लहान मुलांना हरिपाठ मुखोदगत होवून टाळ आणी पखवाद वाजवता यावे हा संस्थानचा या मागील उद्देश आहे .
       भविष्यकाळात वाढत चाललेल्या चंगळवाद आणी मोबाईल चा अतिरेक यापासुन आपल्या मुलांना वाचविण्यासाठी हरिपाठ हा सर्वोतम उपाय आहे असे या प्रसंगी हभप वीर महाराज म्हणाले . हरिपाठ समजून घेतला तर आयुष्यात कधीच व्यक्ती हतबल होत नाही कारण हरिपाठ हा जीवनाला स्थिरता देणारा नित्यपाठ आहे .केवळ हरिपाठाचे चिंतनच माणसाचे जीवन सुखी करु शकते असेही ते म्हणाले .
यावेळी बाल गोपालांच्या टाळाच्या किन किनाटाने वातावरण भारून गेले होते . या उपक्रमात पंचक्रोशीतील सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केशव गोविदं संस्थानच्या वतीने करण्यात आले .

  किशोर भगत