कुंडमळा बघण्यासाठी आलेली तरुणी नदीपात्रात बुडाली... अद्याप पर्यंत शोध मोहीम सुरू..सहा दिवस उलटूनही तरुणी अद्यापही सापडलेली नाही. .. !!!!

कुंडमळा बघण्यासाठी आलेली तरुणी नदीपात्रात बुडाली...  अद्याप पर्यंत शोध मोहीम सुरू..सहा दिवस उलटूनही तरुणी अद्यापही सापडलेली नाही. .. !!!!

पुणे (तळेगाव दाभाडे) ::--
     मैत्रिणी सोबत पर्यटनासाठी आलेली 20 वर्षीय तरुणी पाय घसरून पडल्याने इंद्रायणी नदीत कुंडमळा तालुका मावळ या ठिकाणाहून वाहून गेली आहे.ही घटना बुधवार दिनांक 6 रोजी दुपारी 3 वाजता घडली असून अद्याप पर्यंत नदीपात्रात बुडालेल्या तरुणीचा शोध लागलेला नाही.
  कु. साक्षी सतीश वंजारे (वय -20 राहणार कस्तुरी मार्केट आकुर्डी पुणे ) ही तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत इंदोरी येथील कुंडमळा या ठिकाणी पर्यटनासाठी गेली होती.साक्षी व तिच्या मैत्रिणी नदी काठाच्या पात्रच्या कडेने फिरत असताना त्या ठिकाणी पाऊस पडला असल्याने नदीपात्राच्या कडेला खूप निसरडी जागा झालेली असल्याने  साक्षी चा पाय अचानक त्यावरून घसरला आणि साक्षी नदीपात्रात पडली.  इंद्रायणी नदीला खूप पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली आहे. आणि पाण्याची गतीही वाढलेली आहे. यामुळे बघता बघता साक्षी ही पाण्यात दिसेनाशी झाली तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींनी  खूप आरडाओरड केल्याने जवळच पर्यटनासाठी आलेले नागरिक मदती करीता धावत आले परंतु पाण्याचा ओघ आणि पाण्याची गती जास्त असल्याने कुठल्याही नागरिकाने पाण्यात जाण्याच धाडस केले नाही.अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अजित सावंत यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मारुती मदेवाड ,पोलीस पोलीस ठाणेअंमलदार अशोक आंबेकर,  प्रशांत सरोटे, सुरेश भोजने वन्यजीव रक्षक मावळचे निलेश दराडे ,भास्कर माळी,अविनाश कार्ली,ओंकार बेंडके,दीपक नळे,  बाबु चव्हाण,  विकी दौंडकर,  सौरभ माने ,सत्यम सावंत,  नगरपरिषद पथकाचे गणेश जवळेकर आदींना पाचारण करण्यात आले आहे . या पथकाने सलग तीन ते चार दिवस साक्षी चा शोध घेतला परंतु उद्यापर्यंत साक्षी मिळून आलेली नाही. सकाळी 8 वाजता शोध मोहीम सुरू होऊन संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सलग पाच दिवस साक्षी चा शोध घेण्यात आला. परंतु अद्याप देखील तिचा शोध लागलेला नाही. 
   स्थानिक राहणाऱ्या नागरिकांमधून असे सांगण्यात येते की, आतापर्यंत जेवढे लोक इंद्रायणी नदी पात्रात बुडालेले होते त्यांना सापडण्यास जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी यश मिळाले परंतु पाच दिवस उलटूनही अद्याप पर्यंत साक्षीचा कुठल्याही प्रकारे शोध लागलेला नाही त्यामुळे नागरिकांमधून व नातेवाईकांन मधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या व पर्यटनाला येणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,  ज्या कोणाला या तरुणी विषयी माहिती मिळेल त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 
    कुंडमळा या ठिकाणी दरवर्षी जवळपास आठ ते दहा लोकांचा बुडून मृत्यू होतो. नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहा जवळ जावू नये,सेल्फी काढू नयेत,नदीच्या खडकावर शेवाळ आले आहे त्या ठिकाणी जावू नये असे पोलिसांनी येणाऱ्या लोकांना आव्हान केले आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.