श्रीरामपूर येथील विधी विद्यालयात संविधान दिन साजरा
श्रीरामपूर :-
श्रीरामपूर येथील खा.श्री.गोविंदराव आदिक 'विधी' महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय जी.जी. भरणे साहेब न्यायाधीश (तदर्थ जिल्हा न्यायाधीश 1 व सहा समन्यायाधीश श्रीरामपूर होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी मा. श्री. एस.आर.यादव (दिवाणी न्यायाधीश डी.पी.कासट, दिवाणी न्यायाधीश व्ही. बी. कांबळे, सह दिवाणी न्यायाधीश सौ. एस. व्ही. मोरे, सह दिवाणी न्यायाधीश मा. श्री. एन. के. खराडे, २रे सह दिवाणी न्यायाधीश मा. सौ. डी. एस. खोत, उरे सह दिवाणी न्यायाधीश मा. सौ. पी. ए. पटेल 4थे सह दिवाणी न्यायाधीश अॅड. अतुल चौधरी, सचिव वकिल संघ श्रीरामपूर म्हणून लाभले कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाच्या प्राचार्या राजभोज संघमित्रा यांनी "संविधानाचे" वाचन केले. अॅड. श्री. ऋषीकेश बोर्डे यांनी कलम 39 (2) बद्दल माहिती दिली. अँड. महेंद्र आढाव यांनी मूलभूत हक्कांची अंमलबजावणी ऐतिहासिक काळात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून झाली आहे हे सांगितले तर, अँड अनुजा यादव यांनी मूलभूत हक्क व इच्च्छा मरण याबाबद अतिशय महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली.जी. जी. भरणे (न्यायाधीश) यांनी संविधानाचे महत्त्व, मूलभूत हक्क व अधिकार याबाबद मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. ज्योती शिंदे (S.D.C प्रा. आशा कवडे (N.S.S. प्रमुख) मानसी करंदीकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास अँड. श्री चौधरी, अँड.अर्चना झडे, डॉ वैशाली कदम, राजश्री होले, श्री शेजूळ हे सर्व व विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. श्रुती पंढरीनाथ टोणपे . कु. सतलज संजयकुमार बोराडे यांनी केले.
या दरम्यान रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.रॅली मध्ये सर्व न्यायाधीश, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्व वकिल तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. विद्यार्थीनींनी सुंदर असे पथनाट्य " जागरुकता संविधानाची " या विषयावर सादर केले. आभार प्रदर्शन अँड. धुमाळ यांनी केले. !