*अशोक आयडियल स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ.*

*अशोक आयडियल स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ.*

श्रीरामपूर*
श्रीरामपूर शहरा नजीक असणाऱ्या अशोक शैक्षणिक संकुलाचे प्रमुख माजी आमदार मा.भानुदास मुरकुटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अशोक आयडियल स्कूल या सीबीएसई संलग्न स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ आज प्रमुख पाहुणे श्रीरामपूर स्थानक वासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्री.रमेश लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी प्रसिद्ध पत्रकार श्री. महेश माळवे तसेच श्री. अनिल चोरडिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक कारखान्याच्या संचालिका व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे या होत्या. यावेळी अँग्रो इंडस्ट्रीजचे एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन चे सचिव श्री वीरेश गलांडे हे देखील उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये यशाकरिता शुभेच्छा दिल्या तसेच माननीय भानुदास मुरकुटे साहेब यांचे खेळाबद्दल
तसेच व्यायामाबद्दलची आवड आणि त्यामुळे आरोग्या करिता होणारा फायदा या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या. येथे उपलब्ध असलेले भव्य मैदान व खेळाचे साहीत्य इत्यादी पाहून प्रमुख पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले.
*कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी मशाल पेटवून या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच या प्रसंगी रंगीबेरंगी बलून सोडण्यात आले व शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेचा शुभारंभ पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे योगा आणि खेळांना अनुसरून नृत्य सादर केले. प्राचार्य रईस शेख यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी काळे व अनुष्का गलांडे यांनी केले तसेच या प्रसंगी क्रीडा शिक्षक आसिफ पठाण, सुनील बागुल, वृषाली बकरे, रूपाली देशमुख, चित्रा मुठे,  मनीषा त्रिभुवन तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.