मेडिकलचा परवाना रद्द करण्यासाठी छावाचे उपोषण..कालबाह्य औषध देऊन बालकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रताप. .!!
श्रीरामपूर :
श्रीरामपूर शहरामध्ये लहान मुलांचे प्रसिध्द असणारे बैरागी हॉस्पिटल जवळ असलेल्या नवनाथ मेडिकल यांनी लहान बाळाचे औषध कालबाह्य दिले होते. त्यामुळे त्या लहान बाळाला त्या औषधा मुळे त्रास झाला या लहान बाळाच्या आयुष्याशी खेळण्याचे प्रयत्न केले असल्याने हॉस्पिटल शेजारी असणाऱ्या नवनाथ मेडिकल यांचे परवाने रद्द करण्यासाठी तसेच सदर मेडिकल मालकावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याकरिता छावा संघटनेने दि.14 नोव्हेंबर 2022 रोजी श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी श्री.अनिल पवार साहेब यांना तक्रार दिली होती. पण ती तक्रार देऊन 15 दिवस उलटून सुद्धा कोणतीही कारवाई या बेजबाबदार नवनाथ मेडिकल वर झाली नसून त्यामुळे आज दि.30 नोव्हेंबर 2022 ला छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कोल्हे पाटील आणि छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी नवनाथ मेडिकल वर कारवाई साठी दि.6 डिसेंबर 2022 पासून आमरण उपोषणाला प्रांत कार्यालय श्रीरामपूर यांच्या कार्यालय समोर बसणार असल्याचे पत्र दिले आहे. त्या पत्रावर छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख,छावाचे राजाराम शिंदे हे सुध्दा उपोषणास बसणार असल्याचे पत्रात नमूद केलेले आहे.