अशोकनगर फाट्या लगत निपाणीवडगाव शिवारात आढळला तरुणाचा मृतदेह. .! !
श्रीरामपूर ::-- श्रीरामपूर शहरा लगत असणाऱ्या अशोकनगर फाट्यापासून रेल्वे चौकी नंबर 1 या ठिकाणी असणाऱ्या श्री. रोकडे सर यांच्या शेतामध्ये काल सकाळी मातापुर येथील तरुणाचा मृतदेह आमराई मध्ये आढळून आला. सदर तरुण मातापुर येथे वास्तव्यास असून तो अक्षय तृतीया या दिवसां पासून घरातून कामाला जातो असे सांगून निघून गेला असल्याची माहिती असल्याची सदर तरूणाच्या घरच्यांनी दिली परंतु काल दिनांक 11 मे 2022 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या च्या दरम्यान त्याचा मृतदेह शेतामध्ये असणाऱ्या आमराई मध्ये आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
श्रीरामपूर तालुक्यात असणाऱ्या मातापुर या गावातील सतीश बबन गायकवाड (वय - वर्ष 27 ) राहणार - मातापुर हा तरुण दिनांक 3 मे 2022 रोजी बाहेर गावी कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेला. नंतर सदर तरुण नेवासा येथील जेऊर हैबती गावी असणाऱ्या आपल्या नातेवाईकाकडे जागरण गोंधळ या कार्यक्रमासाठी गेला होता. त्यानंतर हा तरुण कोठे गेला याची कोणतीही माहिती कुठलेही नातेवाईकास मिळाली नाही. परंतु काल दिनांक 11 मे 2022 रोजी (देवकर वस्ती) मांजरे वस्ती या ठिकाणची काही युवक सकाळी प्रातर्विधी साठी जात असता या तरुणांना सदरील व्यक्तीचा मृतदेह आढळून आला मयत व्यक्तीच्या शेजारी असणारी त्याची बॅग चप्पल व रुमाल हे सर्व साहित्य त्याच्याजवळ पडलेली होती.मांजरे वस्तीवर असणाऱ्या मांजरे या तरुणांनी घटनेची माहिती शेतमालक असणाऱ्या श्री. सुधीर रोकडे यांना दिली श्री. रोकडे यांनी ग्रामपंचायत सदस्य असणारे त्यांचे मामा श्री.सर्जेराव देवकर यांना तात्काळ ही माहिती दिली ग्रामपंचायत सदस्य श्री. देवकर यांनी या घटनेविषयी लगेच श्रीरामपूर पोलीस स्टेशनला मयत इसमा विषयाची खबर दिली. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप यांनी तात्काळ आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली परिसरात विचारपूस केली असता सदर तरुण हा मातापूर येथील रहिवासी असून तो घरातून काही दिवसापूर्वी निघून गेल्याचे त्याचे मामा मारोती गंगाधर गिरासे यांनी सांगितले.
श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी श्री. संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांना त्वरित दिली. सदर घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे नेण्यात आला.सतीश याचा मृतदेह व परिसराची पाहणी केली असता सतीश चा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेचा पुढील तपास श्री संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री संतोष दरेकर व इतर तपाशी पोलीस कर्मचारी करत आहेत.