रेल्वे उड्डाणपूल ते अशोकनगर फाटा ह्या दरम्यान रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांची आठवडा भरात डागडुजी न केल्यास रास्ता रोको आंदोलन... माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा इशारा. .. !!! !!
श्रीरामपूर -
श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर रेल्वे उड्डाणपूल ते अशोकनगर फाटा ह्या अंतरातील खड्ड्यांची आठवडा भरात डागडुजी न केल्यास लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक १८ रोजी रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रखड इशारा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दिला आहे.या अगोदर देखील या रस्त्याच्या काम करता अनेक आंदोलने झाली
आहेत.परंतु अदयाप पर्यंत सार्वजनिक बांधकाम खाते श्रीरामपूर यांनी या रस्त्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केल आहे. व वेळो - वेळी आंदोलन करूनही हा रस्ता अद्याप पर्यंत दुरुस्त झालेलं नाही. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर ते नेवासा हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. या रस्त्यावर रेल्वे उड्डाणपूल ते अशोकनगर फाटा यादरम्यान जागोजागी खड्डे पडलेले असून या खड्ड्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा येत असून वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. याची दखल घेवून सदर रस्त्यांची डागडुजी आठ दिवसांत करावी अन्यथा शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे . निवेदन देताना अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, शिरसगावचे सरपंच आबासाहेब गवारे,अशोक कारखान्याचे संचालक रामभाऊ कासार, शिवाजीराव मुठे, उद्धव आहेर, बाबासाहेब पवार, रविंद्र पवार, प्रफुल्ल पवार, बापुसाहेब गायकवाड, अनिल पवार, बाळासाहेब कसार आदी उपस्थित होते.