पिंप्री अवघड येथे कृषी संजीवनी सप्ताह निमित्त शेतकऱ्यांना करण्यात आले मार्गदर्शन .
*कृषी संजीवनी सप्ताह निमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन*
मौजे पिंपरी अवघड येथे कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताह निमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कृषि सहाय्यक श्री शरद लांबे यांनी- ऊस पिकावरील हुमणी अळी चे भुंगेरे नियंत्रणसाठी प्रकाश सापळे तयार करणे ,कापूस पिकाविषयी लागवडीचे अंतर, खतांचे शिफारसी , सापळा पिके याबाबत माहिती देण्यात आली. तसेच एक रुपयात पिक विमा योजना , पी एम किसान योजना, महाडीबीटी वरील कृषी यांत्रिकीकरण योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी पिंपरी अवघड गावचे उपसरपंच लहानु तमनर , सोसायटीचे चेअरमन -मच्छिंद्र लांबे, प्रगतशील शेतकरी -आदिनाथ दौंड ,काशिनाथ दौंड , बापूसाहेब लांबे, सूर्यभान दोंड, सारंगधर लांबे ,रामदास धसाळ ,भाऊसाहेब लांबे, बाळासाहेब लांबे, अनिल धसाळ, दीपक लांबे, ज्ञानदेव लांबे , भाऊसाहेब पवार,अप्पा तमनर ,अर्जुन तमनर ,पंडित लांबे ,विलास दौंड, चांगदेव लांबे ,वसंत लांबे, मच्छिंद्र दौंड, रावसाहेब पवार ,कारभारी तमनर , जिजाबापू लांबे, गणेश दोंड ,निलेश लांबे, अविनाश लांबे , विजय लांबे, संजय होडगर , विकास लांबे, गणेश लांबे ,साईनाथ दोंड आदी शेतकरी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे आभार श्री आदिनाथ दौंड यांनी मानले व कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.