५४ वर्षांनी हरिहर केशव गोविंद बनात केशव गोविन्द भगवंताचे स्तंभ पूनः प्रतिष्ठा विधी सोहळा

५४ वर्षांनी हरिहर केशव गोविंद बनात केशव गोविन्द भगवंताचे स्तंभ पूनः प्रतिष्ठा विधी सोहळा
५४ वर्षांनी हरिहर केशव गोविंद बनात केशव गोविन्द भगवंताचे स्तंभ पूनः प्रतिष्ठा विधी सोहळा
५४ वर्षांनी हरिहर केशव गोविंद बनात केशव गोविन्द भगवंताचे स्तंभ पूनः प्रतिष्ठा विधी सोहळा

श्रीरामपूर तालूक्यातील बेलापूर खुर्द  बन येथील हरिहर केशव गोविंद देवस्थानच्या हरिहर केशव गोविंद स्तंभाच्या पूर्न प्रतिष्ठा सोहळयाला गुरुवार २५ एपील रोजी भव्य अशा त्रिस्थळी शोभायात्रेने सुरुवात झाली. ९०० ते १००० वर्षांची परंपरा असलेल्या या मंदिरात भारतातील एकमेव स्तंभ रुपी शिवलिंग आहेत . पूर्वी चंदनाचे असणारे हे स्तंभ रोजच्या अभिषेक पूजेने जीर्ण होत व ५० ते ६० वर्षांनी हे बदलले जात असे . सध्याचे स्फटीकाचे स्तंभ जीर्ण असल्याने त्या ठिकाणी दूसरे नवे स्तंभ प्रतिष्ठीत करण्यात येत आहेत .आज  गुरुवारी भल्या सकाळी ६वा मंगल कलश घेउन महिला तर हातात भगवा ध्वज व पारंपारीक डफ घेऊन शुभ्र वस्त्रधारण केलेले शेकडो पूरुष या त्रिस्थळी दिंडीत सहभागी झाले . लहान मुलांचा उत्साह त्यांच्या लक्षणीय सहभागाने सर्वांना जाणवत होता .बनातील हरिहरानां वंदन करुन हि दिंडी प्रवरा नदीतुन पायी जात उक्कल गाव येथील केशव गोविंद मंदिरात दर्शनाला पोहोचली . उक्कल गाव येथील भाविक केशव गोविंदाचे प्रतीक असलेल्या अबदागिरी , पताका व डफ घेऊन या दिंडीच्या स्वागताला सामोरे गेले . येथुन प्रस्थान करत महिलांच्या लेझीम नृत्य, व भजनी मंडळाच्या भावविभोर भजनाच्या तालात बेलापूर बु येथे पोहोचली . यावेळी मा सरपंच भरत साळूंके यांच्या वतीने सर्वांच्या नाश्ता सरबताची व्यवस्था करण्यात आली . बेलापूर बु॥ येथे प्रचंड जल्लोषात दिंडीचे स्वागत करण्यात आले . पेठेतुन मार्ग काढत दिंडी केशव गोविंद मंदिरात पोहोचली . येथे मान्यवरांनी स्वागत केले व केशव गोविंद देवतेची आरती करण्यात आली . येथून हि दिंडी बेलापूर खुर्द गाव व केसापूर  मार्गे पून्हा बनात आली .

अठवडाभर सुरू राहणाऱ्या या कार्यक्रमाने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे . राष्ट्रसंत प पू स्वामी गोविंददेवगिरी ( कोषाध्यक्ष , राममंदिर अयोध्या ) यांच्या हस्ते होणाऱ्या या प्राणप्रतिष्ठा विधी सोहळयात प.पू भास्कर गिरी जी महाराज ( श्री क्षेत्र देवगड ) तसेच सराला बेटाचे मठाधिपती प पू रामगीरी जी महाराज उपस्थीत राहणार असुन  हभप बाबानंद महाराज वीर व प पू मोहन काका खानवेलकर यांच्या अधिपत्याखाली हा सोहळा होत आहे . या सोहळयात रविवार २८ एप्रिल ते ३० एप्रिल रोजी रोज सायं ७ वा प पू महेश जी व्यास यांच्या श्रीमुखातून हरिहर केशव गोविन्द महात्म्य कथा श्रवण करता येईल . तसेच दि २९ , ३० व १ मे या दरम्यान स्तंभमूर्ती पूजा , जल ,धान्य अधिवास , होम हवन , प्रतिष्ठा विधी इत्यादी राक्षस भूवन येथील पूरोहितांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे . यासाठी भव्य अश्या लाकडी यज्ञ मंडपाची उभारणी मंदिराच्या प्रांगणात करण्यात आली आहे .

 बुधवार १ मे रोजी सकाळी ७ ते ८ः३० या वेळेत राष्ट्रसंत प पू स्वामी गोविंद देवगिरी जी महाराज यांच्या हस्ते मुख्य प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न होईल व त्यानंतर निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे जनक भानुदास महाराज यांचे वशंज हभप मोहन महाराज बेलापूरकर यांचे सुश्राव्य किर्तन व त्यानंतर महाप्रसाद होईल . या सोळयास लाखो भाविक उपस्थीत राहतील अशी अपेक्षा आहे .