संतप्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा हजारोंच्या संख्येने मुंबई विधान भवनावर धडक मोर्चा.
महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायत मधिल कुशल व अकुशल कामगारांचा भव्य मोर्चा आज मुंबई विधान भवनावर धडकला आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे मिळावे यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन (रजिस्टर नंबर ४५११) चे राज्य पदाधिकारी यांनी शासन दरबारी कायम पाठपुरावा केला आहे आणि तो आज पण चालू आहे . सरकारने याकडे कायमच कानाडोळा केला आहे . गेल्या १८ महिन्यापूर्वी कामगार विभागाने किमान वेतन वाढ लागू केली परंतू या महाआघाडी सरकारने मंजुरी देण्यासाठी कायम टाळाटाळ केली आहे त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी आज मुंबई विधान भवनावर धडक मोर्चा काढला आहे.सुधारित किमान वेतन वाढ लागू करावी ,नगरपरिषद नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी देण्यात यावी ,वसुलीची अट रद्द करावी ,पेन्शन योजना लागू करावी अशा या प्रमुख मागण्या सहित त्यांनी मोर्चा काढला आहे .
ग्रामपंचायत कर्मचारी अतिशय कठीण परिस्थितीत गावच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देत असतात .अतिशय तुटपुंज्या पगारात त्यांना त्यांचे कुटुंब चालवावे लागते .अशा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध प्रकारचे प्रश्न गेल्या वीस वर्षापासून प्रलंबित आहेत त्यामुळे आता त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असून सरकारला एक जोरदार धक्का देण्यासाठी आम्ही हा निर्धार मोर्चा काढला असल्याचे मत ठाणे जिल्हाध्यक्ष अजय जाधव यांनी सांगितले आहे.
राज्यात २७ हजार ९२० ग्रामपंचायती असून यामध्ये ६० हजारच्या आसपास कर्मचारी आहेत .यांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या वीस वर्षापासून प्रलंबित आहे. १०जुलै २०१८ रोजी नागपूर येथील लॉंग मार्च तसेच ७ जानेवारी २०१९ ला लातूर येथे भव्य अधिवेशन भरविले होते. यावेळी तत्कालीन ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय २० जानेवारी २०२० रोजी राज्यातील ३४ जिल्ह्यांमधून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते.मात्र त्यांच्या मागण्या आज पर्यंत मंजूर करण्यात आल्या नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे आणि तो मोर्चाच्या रूपाने बाहेर पडताना आज मुंबई विधान भवन येथे दिसून येत आहे.