बारा कर्तुत्ववान महिलांना सन्मानचिन्ह देऊन ब्रह्मा अग्रो फाउंडेशन च्या वतीने गौरवण्यात आले.

बारा कर्तुत्ववान महिलांना सन्मानचिन्ह देऊन ब्रह्मा अग्रो फाउंडेशन च्या वतीने गौरवण्यात आले.

ब्रम्हअँग्रो फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

अहमदनगर : सतत समाजासाठी व समजाच्या हितासाठी काम करणारी संस्था म्हणजे ब्रम्हअँग्रो फाऊंडेशन चे नांव घेतले जाते. याच उद्देशाने सोलापूर जिल्हा कार्यकारिणी च्या वतीने काल जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी १२ कर्तृत्ववान महिला भगिनींचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री विवेक कुंभेजकर व सौ गीतांजली देशमुख हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रीकांतजी दंडवते याची निवड करण्यात आली. "यावेळी महिला सक्षमीकरण " या विषयावर प्रमुख वक्ते सौ सारीका कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रदेश कार्याध्यक्ष उमेश काशीकर यांनी केले. सोलापूर जिल्हाध्यक्षा सौ सरीता नाईक यांनी सुंदर असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. तर संपर्क प्रमुख महिला पदाधिकारी यांचे सौ धनश्री उत्पात यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोलापूर जिल्हा कार्यकारिणी व सोशल मीडिया प्रमुख महेश कुलकर्णी यांनी खुप सहकार्य केले.

यावेळी सौ.आरती काशीकर, सौ.सुनीता देशपांडे, सौ.मंजुषा देशपांडे, कीर्ता देशपांडे, श्रीकांतजी देशपांडे सांगोला, सोलापूर जिल्हाध्यक्ष विनायक देशपांडे उपस्थित होते.