पिंप्री अवघड येथिल उड्डाण पूलाजवळ सोनई करजगाव पाईपलाईनच्या एअर वॉलला चारचाकी वाहनाची धडक ; पाईपलाईन बंद .

पिंप्री अवघड येथिल उड्डाण पूलाजवळ सोनई करजगाव पाईपलाईनच्या एअर वॉलला चारचाकी वाहनाची धडक ; पाईपलाईन बंद .

राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथिल उड्डाण पुलाजवळ महिंद्रा एक्सयुव्ही या वाहनाने सोनई करजगाव पाणी योजनेच्या एअर वॉलला जोराची धडक दिली आहे. या धडकेमुळे एअर वॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सागर कल्हापुरे यांच्या शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून येत होते . या अपघातमुळे सदरची पाईपलाईन तात्काळ बंद करण्यात आली आहे .

 

सदर घटनेची हकिकत :

         महिंद्रा एक्सयुव्ही कंपनीची MH 16 BM 0007 ही गाडी राहुरीकडून शिंगणापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असतांना पिंप्री अवघड येथिलं उडड़ाणपूलाच्या जवळ येताच वाहन चालकाचा ताबा सुटल्याने ही गाडी उड्डाण पुलाच्या डाव्या बाजूला मुख्य रस्ता सोडून कल्हापूरे यांच्या शेतात गेली. या शेतामध्ये सोनई करजगाव पाणी योजनेचा एअर वॉलला या वाहनाची जोराची धडक बसल्याने एअर वॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन तेथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला आहे .

 

         वाहन चालकाचे दैव बलवत्तर होते म्हणून मोठी हाणी झाली नाही . गाडी ज्या ठिकाणाहून शेतात गेली त्या ठिकाणी विद्युत वाहिनीची मुख्य लाईन गेलेली आहे . या विद्युत वाहिनीच्या लोखंडी खांबाला ही गाडी धडकली असती तर फार मोठा अपघात झाला असता अशी चर्चा या ठिकाणी सुरू होती .

 

        वारंवार कोणत्या न कोणत्या कारणाने ही पाईपलाईन बंद पडत असते . त्यामूळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते . दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था या पाईप लाईनची झाली आहे . भर उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे . या अपघाताने कल्हापूरे यांच्या शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते .हे दृष्य पाहण्यासाठी प्रवासी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती .

 

       या पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे . दारुच्या नशेत वाहन चालवणाऱ्या चालकावर कारवाई होणार का ? की तडजोड करून प्रकरण रफा दफा होणार याकडेही सर्वांच्या नजरा लागून आहेत .