कहार समाज युवा प्रतिष्ठान आढावा बैठक संपन्न

कहार समाज युवा प्रतिष्ठान आढावा बैठक संपन्न

शेवगाव :-  तालुका प्रतिनिधी 

कहार समाज युवा प्रतिष्ठान जिल्हास्तरीय कार्यकर्ता आढावा बैठक शेवगाव तालुका खानापूर येथे शनिवारी पार पडली.

यावेळी कहार समाज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रमेश गव्हाणे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कहार समाज युवा प्रतिष्ठान माध्यमातून त्यांनी नेतृत्व कसा करावा अन्यायाविरुद्ध आवाज कसा उठवावा समाज उपयोगी कार्यक्रम केले आहेत कहार समाजामध्ये वंचित घटक शोषित शेतमजूर शेतकरी मच्छिमारी नोकरीवाली विविध क्षेत्रात कामे करणारे लोक आहेत त्यांना भरपूर अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा कहार समाज युवा प्रतिष्ठान पुढाकार येणार आहेत. महिलावर होणाऱ्या अन्याय अत्याचार बालकावर होणारे अत्याचार तसेच यामध्ये असलेली कहार तरुण व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम कहार समाजामध्ये वैज्ञानिक जाणीव निर्माण करण्यासाठी कार्यक्रम घेणार आहे. विविध कार्यक्रम या ठिकाणी कहार समाज युवा प्रतिष्ठान यापुढे राबविणार आहे. याठिकाणी शेवगाव तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात संघटनेला प्रतिसाद मिळाला आहे आपले अनेक प्रश्न प्रलंबित असून या सरकारला आपल्याला दाखवून द्यायचे आहे त्यासाठी आपले सतर्क राहणे गरजेचे आहे. गावागावातून शहरापर्यंत कहार समाज युवा प्रतिष्ठान बांधणी करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन कहार समाज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रमेश गव्हाणे यावेळी संघटनांच्या काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रामदास लिंबोरे. शेवगाव तालुका अध्यक्ष रामेश्वर बलैय्या. शेवगाव तालुका अध्यक्ष लक्ष्मण लिंबोरे. याप्रसंगी संघटनेचे सचिव मच्छिंद्र गव्हाणे. अशोक भंडारे .मोहन लिंबोरे. उत्तम काटे. नवनाथ बलैय्या. कृष्णा बलैय्या. चंद्रकांत थोरात. आदिनाथ जगधने. साईनाथ बलैय्या. कृष्णा लिंबोरे. लहू लिंबोरे. देविदास लिंबोरे .लहू बलैय्या. अंकुश लिंबोरे. यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.