चाइल्ड इंग्लिश करियर स्कूल ने केला आगळा वेगळा उपक्रम पक्षांना अन्न व पाण्याची केली सुविधा वाचा सविस्तर वृत्तांत.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
बालाजी देडगाव (प्रतिनिधी )नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता, शिस्त, संस्कार आणि संस्कृती जपणारी शाळा म्हणून लौकिक असलेली शाळा चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या मुलांनी उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने व निष्पर्ण होत चाललेली वृक्ष यामुळे पक्षांचे अन्न व पाण्यावाचून हाल होऊ नये.शाळेच्या निसर्गरम्य परिसरात म्हणून अन्न,पाणी व निवारा याची व्यवस्था केली आहे.
पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागविण्यासाठी पक्षाची मात्र धडपड सुरू असते.त्यांच्या जीवाला थोडा गारवा देण्यासाठी गरज आहे मुटभर धान्याची व वाटीभर पाण्याची..उन्हाच्या प्रखर झलामध्ये पक्षांची जगण्यासाठी धडपड थांबविण्यासाठी व पक्षांसाठी च्या जाणिवेचा हा ओलावा वाढविण्यासाठी सर्वांकडून बळ मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शाळेचे प्रमुख श्री सागर बनसोडे सर यांनी केले.
चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे शिक्षक विजय खाटीक यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी झाडाला मडकी,भांडी बांधून त्यात पाणी व धान्याची व्यवस्था करून पक्षांसाठी एक दिलासा दिला आहे.तसेच शाळेच्या निसर्गरम्य परिसरात पाणी ,अन्न व निवारा या गोष्टीची सोय झाल्याने अनेक पक्षी शाळेच्या परिसरात विसावले आहेत.कबुतरे, काळी मैना,चिमणी, पोपट, कावळा,सुतार पक्षी,होला,नर्तक,परवा असे अनेक पक्षी शाळेच्या परिसरात अन्न , पाणी व निवारा उपलब्ध झाल्याने विसावले आहेत.सदर उपक्रमात श्री.विजय खाटीक यांचे मार्गदर्शनाखाली शाहरुख सय्यद,वैभव पवार,अमोल इंगळे,संदीप खाटीक परिश्रम घेत आहे
त.