ख्रिस्ती बंधू भगिनींची क्रुसाच्या वाटेची भक्ती एक अनमोल संदेश.

ख्रिस्ती बंधू भगिनींची क्रुसाच्या वाटेची भक्ती एक अनमोल संदेश.
ख्रिस्ती बंधू भगिनींची क्रुसाच्या वाटेची भक्ती एक अनमोल संदेश.

श्रीरामपूर :- उपवास काळातील धार्मिक भाग म्हणून क्रुसाची वाटेची भक्ती केली जाते. अन्नापासून उपवास केल्याने आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत होऊन गरीब शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे, भूमिहीन आणि बेरोजगार लोकांबद्दल सहानुभूती निर्माण होते. त्यांच्यासाठी. आर्थिक गरिबी ही त्यांची रोजची भाकरी बनली आहे. त्यांचे दु:ख आणि दुर्दशा आपल्याला परिवर्तनाच्या प्रक्रियेत टिकवून ठेवतात. तिघांपैकी, दान देणे कधीकधी वरवरचे समजले जाते. गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी, आर्थिक सहाय्य आवश्यक आहे, परंतु प्राचीन ग्रीक आणि लॅटिनमध्ये, दान, दया आणि करुणेमध्ये अविभाज्य मुळे आहेत. म्हणून, आर्थिक मदतीसह, आपण लोकांसोबत दया, क्षमा आणि शांती देवू करूया. दया करणे हा प्राण्यांचा हक्क आहे. क्षमा आणि शांती, कारण देव आपल्यावर दयाळू आहे; तो आमच्या पापांची क्षमा करत आहे आणि आम्हाला त्याचा प्रिय पुत्र, उठलेल्या ख्रिस्ताची शांती अर्पण करत आहे. संपूर्ण सृष्टी उठलेल्या ख्रिस्ताच्या शांतीसाठी आसुसलेली आहे. या इस्टरमध्ये, दया, प्रेम, क्षमा आणि शांती संदेश देण्यासाठी, श्रीरामपूर येथील लोयोला सदन, लोयोला दिव्यवाणी, संत विन्सेंट चर्च, आगाशेनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र क्रुसाची वाट सोमवार दिनांक २५/०३/२०२४ रोजी सकाळी ७:०० वाजता श्रीरामपूर लोयोला सदन येथून निघाली.नंतर पुढील १४ स्थाने घेतली गेली.त्यामध्ये सुरूवातीची भक्ती लोयोला चर्च श्रीरामपूर,पहिले स्थान पवित्र क्रुस तीर्थ क्षेत्र करूणा माता चर्च वैजापूर,दुसरे स्थान संत फ्रॉन्सिस झेवियर चर्च मनमाड, तिसरे स्थानाची भक्ती करूणा हाॅस्पिटल मनमाड, चौथे स्थान संत झेवियर हायस्कूल मनमाड याठिकाणी, पाचवे स्थान संत विन्सेंट चर्च येवला, सहावे स्थान सेंट मेरी चर्च कोपरगाव येथे, सातवे स्थान सेवानिकेतन चर्च कोपरगाव,आठवे स्थान होली फॅमिली चर्च कोपरगाव येथे, नववे स्थान माऊंट फोर्ड स्कूल सावळी विहीर,दहावे स्थान संत फ्रॉन्सिस झेवियर चर्च राहाता, अकरावे स्थान निष्कलंक माता चर्च प्रवरानगर, बारावे स्थान बाळ येशू चर्च बाभळेश्वर, तेरावे स्थान सेंट विन्सेंट चर्च (डि पाॅल स्कूल) आगाशेनगर याठिकाणी आणि शेवटचे चौदावे स्थान लोयोला दिव्यवाणी नॉर्दन ब्रॅच श्रीरामपूर याठिकाणी क्रुसाच्या वाटेच्या भक्तीची सांगता करण्यात आली.याप्रसंगी श्रीरामपूर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.ज्यो गायकवाड,सेंट विन्सेंट चर्चचे रे.फा. थॉमस व रेव्ह फा .संजय ब्राह्मणे  .रेव्ह फा . सयाराज,  रेव्ह फा मायकल. ब्रदर जोसेफ.रेव्ह फा. गिल्बट, रेव्ह फा.अनिल चक्रनारायण, रेव्ह फा. मॅथ्यू तसेच रविंद्र लोंढे व दिपक कदम, नितिन जाधव, प्रमोद संसारे यांनी उत्कृष्ट पध्दतीने नियोजन केले होते.या धार्मिक क्रुसाच्या वाटेची भक्तीच्या सोहळ्यात जवळजवळ ७०   स्त्री व पुरूषांनी सहभाग घेतला होता.यासाठी सेंट विन्सेंट चर्चचे प्रमुख धर्मगुरू यांनी यासर्व प्रवासासाठी बस दिली होती त्यांचे विशेष आभार.