मोहिनी पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षपदी अरविंद घाडगे तर उपाध्यक्षपदी काकासाहेब काळे यांची बिनविरोध निवड.

मोहिनी पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षपदी अरविंद घाडगे तर उपाध्यक्षपदी काकासाहेब काळे यांची बिनविरोध निवड.

मोहिनी पाणी वापर संस्थेच्या चेअरमन पदी प्रगतशील शेतकरी *अरविंद गोविंद घाडगे पाटील* व व्हा.चेअरमन पदी काळे काकासाहेब बाजीराव यांची बिनविरोध निवड झाली . 

बालाजी देडगाव:- ( प्रतिनिधी युनूस पठाण) नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे मोहिनी पाणी वापर संस्थेची मुळा पाटबंधारे सिंचन विभाग तेलकुडगाव या ठिकाणी सभा झाली. सभेसाठी मोहिनी पाणी वापर संस्थेचे सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. चेअरमनपदासाठी सूचक म्हणून रमेश भुजंगराव घोडेचोर यांनी ठराव मांडला व त्यास गोरक्षनाथ काळे यांनी अनुमोदन दिले.  

        यावेळी काकासाहेब बाजीराव काळे ,रमेश भुजंगराव घोडेचोर, अनिल पद्ममाकर राजहंस , काळे संदीप काशिनाथ ,गोरक्षनाथ मच्छिंद्र काळे ,प्रा.मधुकर जगन्नाथ घाडगे , प्रा.काळे बाळासाहेब कचरू,नामदेव बाबुराव घोडेचोर, शिवनाथ भाऊराव घाडगे , बंडू तात्या घोडेचोर ,संस्थेचे सचिव किशोर बन्सी घाडगे उपस्थित होते.

       चेअरमन पदाची निवडणूक करण्यासाठी सरकारी अधिकारी म्हणून मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी चव्हाण साहेब व सानप यांनी काम पाहिले. तेलकुडगाव ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य ,तेलकुडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हा.चेअरमन व सर्व संचालक यांनी मोहिनी पाणी वापर संस्थेचे बिनविरोध निवडी बद्दल कौतुक व अभिनंदन केले.