संगमनेर तालुक्यातील गायरान जमिनीतील निवासी अतिक्रमणे नियमित करणे बाबत

संगमनेर:-आज दि. २५/११/२०२२ रोजी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, प्रा. मच्छिंद्रजी सकटे सर यांच्या मार्गदर्शनाने व प्रदेशाध्यक्ष, मा. काशिनाथ सुलाखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील गायराण जमिनीवर निवासी अतिक्रमणे नियमित करणे बाबत संगमनेर दलित महासंघाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, या मोर्चात बोटा गावातील रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी तालुक्याचे नायब तहसीलदार श्री शिरोळे साहेब यांना निवेदन देण्यात आले, निवेदनात असे म्हटले आहे की बोटा गावातील तसेच संगमनेर तालुक्यातील गायरान जिमिनितील निवासी अतिक्रमणे हे कायम करण्यात यावे व तेथील रहिवाश्यांना त्यांच्या नावाने ७/१२ व ८ अ उतारे देण्यात यावे. निवेदन देताना दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, मा.काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हा अध्यक्ष, संजय चांदणे, उत्तर जिल्हा अध्यक्ष, चंद्रकांत चव्हाण सर, राहाता तालुका अध्यक्ष, अमोल जगधने सर, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष, चंद्रकांत सकट, संगमनेर तालुका अध्यक्ष, सौ. मंदाकिनी मेंगाळे, उपाध्यक्ष लताबाई मेंगाळे, संतोष शेळके, प्रविण शेळके, रवींद्र भालेकर,अशोक साळवे, सौ.रुकसाना शेख, संगीता साळवे आदी कार्यकर्ते व बोटा गावातील रहिवासी उपस्थित होते.. BPSlive-Reporter Nikale Prakash, Shrirampur

1.

Next