नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे विविध ठिकाणी ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
आज बालाजी देडगाव येथील प्रथमतः ग्रामपंचायत देडगाव येथे विद्यमान सरपंच स्वातीताई चंद्रकांत मुंगसे व बंडू मस्के मेजर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी देडगाव चे विद्यमान सरपंच यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत गावात प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहण करताना कोणाचे संकट लक्षात घेता ध्वजारोहण कमी लोकात साजरा करावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आभार ग्रामसेवक संतोष उल्ल्हारे यांनी मानले.
ग्रामपंचायत कार्यक्रम नंतर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव येथे जाऊन विद्यमान सरपंच स्वातीताई चंद्रकांत मुंगसे तसेच मुख्याध्यापक भोसले सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .त्यानंतर मुख्याध्यापक यांनी भारताचे संविधान उद्देशिका वाचन करून सर्वांकडून वाचन करून घेतले व उपस्थितांचे आभार मानले.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव यानंतर अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय या ठिकाणीही ध्वजारोहण उत्साहात साजरा झाला. मुळा एज्युकेशन चे सदस्य तथा ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक बाजीराव पाटील मुंगसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .शाळेत मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत सर्वांचे आभार मानले .या सर्व ठिकाणी ध्वजारोहन च्या कार्यक्रमास गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
बी पी एस न्युज नेवासा तालुका प्रतिनिधी युनूस पठाण.