डिव्हाईन मर्सी होम, लोणी येथे अंमली पदार्थ आणि व्यसनाचे शारीरिक, परिवारीक व सामाजिक दुष्परिणाम आणि व्यसन मुक्तीसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
श्रीरामपूर-लोणी: दि १६ ऑक्टोबर २०२२ रोजी, मेरी एज्युकेशन फाउंडेशनने गुड शेफर्ड रिकव्हरी होम्स, रँच, पुणे यांच्या सहकार्याने , डिव्हाईन मर्सी होम, लोणी येथे अंमली पदार्थ आणि व्यसनाचे शारीरिक, परिवारीक व सामाजिक दुष्परिणाम आणि व्यसन मुक्तीसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
प्रसंगी श्री.बाबा डॅनियल खरात, रेव्ह. फादर संजय ब्राह्मणे, श्री. पगारे राजाभाऊ,श्री. बोधक सर, मानसशास्त्रज्ञ श्री. नागरे सर, श्री. गमे सर, डाॅ. वाघ यांनी उपस्थित अंमली पदार्थ आणि व्यसन मुक्त होऊ इच्छित असणाऱ्या २० व्यक्तींना प्रभावी समुपदेशन केले.
सर्व मा. मान्यवर, पाहुणे आणि हितचिंतकांनी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रसाद जाॅन सर आणि रेव्ह फा. संजय ब्राह्मणे यांनी घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
देवाच्या कृपेने आणि श्री. बाबा खरात आणि रेव्ह. फादर संजय ब्राह्मणे यांच्या प्रार्थनेने तसेच मार्गदर्शन व प्रेरणेने सदरील परिसंवाद सत्र यशस्वी झाले.
दर महिन्याच्या पहिल्या रविवारी याप्रकारे सेमिनार आणि व्यसन मुक्तीसाठी समुपदेशन सत्रे व्यावसायिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घेण्याचे ठरले आहे.
सर्व मान्यवर, पाहुणे हितचिंतक आणि वसन मुक्ती समुपदेशन साठी आलेले २० व्यक्तींच्यासह सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. प्राचार्य, श्री. राजेश माघाडे सैनिकी स्कूल, लोणी. यांनी केले तर श्रीरामपूर येथील सौ. व श्री. निकाळे सर यांचे डिजिटल सादरीकरणाबद्दल विशेष सहकार्य लाभले आणि शेवटी सेक्रेटरी श्रीमती गेनी प्रसाद जाॅन यांनी सर्वांचे आभार मानले.