गोदावरी नदीला पूर. .! ! महंत रामगिरी महाराजांचे भाविकांना आव्हान. .गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी सरलाबेट या ठिकाणी येऊ नये. .! !

गोदावरी नदीला पूर. .! ! महंत रामगिरी महाराजांचे भाविकांना आव्हान. .गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी सरलाबेट या ठिकाणी येऊ नये. .! !

वैजापूर --
     वैजापूर तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या सरला बेट या ठिकाणी गुरुपौर्णिमा निमित्ताने अनेक भाविकांची रेलचेल या भागात असते. परंतु गेल्या दोन चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने नाशिक या ठिकाणी जोरदार पाऊस चालू असून त्यामुळे नाशिक भागासह गोदावरीला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. आणि त्यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. गोदावरी नदीच्या काठावर असणारे कोपरगाव ,पुणतांबा, वैजापूर तालुक्यातील सरला बेट त्याचप्रमाणे श्रीरामपूर ,नेवासा, औरंगाबाद या ठिकाणा वरून  नदीचा प्रवास असून या भागात गोदावरी नदीला पूर आल्यामुळे नदीवरील जवळपास चार पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामध्ये सरला बेट या ठिकाणी देखील नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून अनेक गावांचा संपर्क पाण्यामुळे तुटला आहे. पाण्याचा विसर्ग वाढत आहे हे लक्षात घेता आज दिनांक बुधवार 13 रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अनेक भाविक सरला बेट या ठिकाणी महाराजांचे दर्शनासाठी येत असतात परंतु पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे या परिसरात औरंगाबाद व नगर वरून येणाऱ्या भाविकांनी कृपा करून सरलाबेट या ठिकाणी येऊ नये असे आव्हान सरला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी भाविकांना केले आहे. 
   गोदावरी काठी या तालुक्यामध्ये 17 गावे वसलेली आहेत. अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्याला जोडणाऱ्या या नदीवर 6 पूल बांधलेले असून त्यापैकी 4 पुल पाण्याखाली गेले असून राहिलेले पूलही संध्याकाळपर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.तालुक्यामध्ये पाऊस थांबलेला असून नाशिक मधमेश्वर  या धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होत आहे त्यामुळे गोदावरी नदी तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे सरला बेट या ठिकाणी असणाऱ्या पुलावरून देखील  पाणी वाहत आहे.त्यामुळे  गुरुपौर्णिमे निमित्त येणाऱ्या भाविकांना या पाण्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने भाविकांनी सरलाबेट या ठिकाणी येऊ नये, आपण स्वतःच्या घरात बसून आपल्या कुटुंबासोबत गुरूपौर्णिमा साजरी करावी असे आव्हान बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी या वेळेस केले आहे. पाण्याची पातळी वाढल्याने भाविक या ठिकाणी येऊ शकतात त्या करीता पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले असून नदी काठी तसेच सरला बेट या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त करिता गिरगावचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे व त्यांचा फौजफाट्या सह अनेक पोलीस या ठिकाणी बंदोबस्त करता हजर झाले आहेत.