भीम पँथर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य (श्रीरामपूर ) चे वतीने श्रीरामपुर तालुका तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन...!

भीम पँथर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य (श्रीरामपूर ) चे वतीने श्रीरामपुर तालुका तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन...!

श्रीरामपूर --
 महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशीच्या जवळपास 38 रेल्वे गाड्या रेल्वेने रद्द केल्या असून त्या गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात व त्या गाड्या रद्द करण्याचा  निर्णय मागे घ्यावा या करिता श्रीरामपूर चे तहसीलदार यांना भीम पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.त्याच प्रमाणे श्रीरामपुर शहरामध्ये असणारी सिग्नल यंत्रणा चालू होणे करिता श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे ,वाहतूक पोलिस विभाग , श्रीरामपूर नगरपालिका यांना देखील भीम पॅंथर सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.श्रीरामपूर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली असून त्यामुळे श्रीरामपूर मध्ये अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत या वाहतूक यंत्रणेला सुरळीत मार्गावर आण्याकरिता व होणारे छोटे - मोठे अपघात टाळण्याकरिता व दर दिवस होणारी वाहतुकीची कोंडी थांबवण्याकरिता सिग्नल यंत्रणा चालू होणे अत्यंत गरजेचे आहे.या सर्व मागण्याकडे पोलीस अधिकारी व श्रीरामपूर चे तहसीलदार यांनी त्वरित लक्ष घालावे असे निवेदन आज भीम पँथर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.शिवाजीराव गांगुर्डे साहेब यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वा खाली व उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नानासाहेब शिंदे यांच्या कडून करण्यात आले आहे.
    याप्रसंगी भीम पँथर सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल भाऊ काळे , उपाध्यक्ष संजय वाहुळ साहेब , प्रदेश महासचिव राज खान साहेब , जिल्हा कार्याध्यक्ष इमरान बागवान , शहर अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे , तालुका सरचिटणीस सागर राठोड व  संजय सोनवणे उपस्थित होते..