गावठी कट्टा दाखवून हॉटेल मालकाला मागितली खंडणी तीन आरोपींना अटक. .एक आरोपी फरार . .! !

गावठी कट्टा दाखवून हॉटेल मालकाला मागितली खंडणी तीन आरोपींना अटक. .एक आरोपी फरार . .! !

श्रीरामपूर :-- श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या वाकडी ते गणेशनगर रस्त्यावरील – हॉटेल न्यू आनंद याठिकाणी दुपारीसुमारे 4:30  वाजेच्या दरम्यान हॉटेल मालक विजय हारीभाऊ चोळके वय वर्ष- ३५ (राहणार अस्तगांव) हे आपल्या हॉटेल वर बसले असता त्या ठिकाणी काही गुंड प्रव्रुत्ति असणारे 4-5 लोक आले. त्यांनी जेवणा करिता कोबडी आणून ती बनविण्याची ऑर्डर दिली. परंतु ऑर्डर येण्यासाठी वेळ लागला त्याच दरम्यान त्या गुंड प्रव्रुत्ति असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जवळ असलेला गावठी कट्टा चोळके  यांच्या दिशेने उगारला.  काही समजन्याच्या आत त्या गुंडांनी गावठी कट्याने गोळी झाडून संध्याकाळ पर्यंत आम्हांला ५ लाख रुपये न दिल्यास तुला जीवे मारून टाकू अशी धमकी देत मारहाण करून श्री. चोळके यांच्या गळ्यातील 6 ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट व 5 ग्रॅम सोन्याची आंगठी असा एकूण 44 हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली.  यासंदर्भातची माहिती मिळताच. श्रीरामपूर शहराचे अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर डी.वाय.एस.पी. श्री.संदीप मिटके व पोलीस निरीक्षक श्री.मच्छिंद्र खाडे हे पोलीस ताफ्या सोबत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घडलेली सर्व हकीकत हॉटेल मालक श्री. विजय चोळके यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितली. 
       या घटनेची सविस्तर हकीगत अशी आहे की दुपारी गणेशनगर येथील सतिष रावसाहेब वायदंडे, रमेश तान्हाजी वायदंडे ,व रामपूरवाडी येथील गोरक्षनाथ भुसाळ आणि दत्तात्रय जगताप हे सोबत आणलेली जिवंत कोंबडी जेवणासाठी बनून देण्याची मागणी केली व  त्यांनी सोबत आणलेली दारू पिऊ लागले.दरम्यान चिकन बनविण्यास वेळ लागत असल्याने सतिष व रमेश वायदंडे हे वेटरला शिव्या देऊ लागला. त्यानंतर चोळके यांच्यावर दारूची मोकळी बाटली फेकली त्याच वेळी रमेश वायदंडे याने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढल्याचे सांगून विजय हारीभाऊ चोळकेयांच्यादिशेने रोखला आणि त्यातून एक गोळी श्री.चोळके यांच्या दिशेने झाडली असता प्रसंगावधानदाखवून चोळके यांनी लगेचच त्याचा हात धरला त्या मुळे होणारी जीवित हानी टळली श्रीचोळके यांनी या बाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सतिष रावसाहेब वायदंडे ,रमेश तान्हाजी वायदंडे ,गोरक्षनाथ भुसाळ व दत्तात्रय जगताप यांच्या विरुद्ध भा.द.वी.कलम 397 386/34 आर्म अक्ट 3/ 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्याद दाखल होताच तात्काळ पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून चौथ्या आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून सदर गुन्ह्याच्या पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर डी.वाय.एस.पी.श्री.  संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री. मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निकम, श्री. अतुल बोरसे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र लवान्दे,मोहन शिंदे अशोक अडागळे प्रशांत रननवरे ,आबासाहेब गोरे दादा लोंढे आदी करीत आहेत.