श्रीरामपूर :::-- बौध्द सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रताप देवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली १८ वा वर्धापनदिन व समाजातील मान्यवरांचा समाजरत्न पुरस्कार देऊन गुण गौरव करण्याचा कार्यक्रम घडून आणला.सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले श्री.दिपक कदम यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र ख्रिस्ती अल्पसंख्याक विकास परिषदेच्या माध्यामातून अनेक गोरगरिबांच्या सेवेसाठी सतत उपलब्ध असणारा कार्यकर्ता, कोरोना काळामध्ये अनेकांना बेड उपलब्ध नसतानाही बेड उपलब्ध करून देणारे ,,अनेक लोंकाना विशेष गरजू गरिब लोकांना रेशनधान्य मिळवून देणारे ,,अनेकाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सतत धडपडत करीत असणारे सामजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे श्री. दिपक कदम यांनी अनेक संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य केलेले दिसून येतात.बौध्द सेवा संघाने समाजरत्न पुरस्कार देताना निश्चित योग्य व्यक्तीची निवड केली यांचा मला सार्थ अभिमान आहे
     विधानपरिषदेचे शिक्षक मतदार संघातील आमदार डाँ.सुधीरजी तांबे साहेब.श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार श्री. लहू कानडे,,बौध्द सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रताप देवरे साहेब,, मा.उपनराध्यक्ष न.प.श्रीरामपूर ,, संचालक अहमदनगर जिल्हा बँक  नामको बँकचे संचालक करणदादा ससाणे,, विश्वस्त साईबाबा संस्थान शिर्डी मा.सचिनभाऊ गुजर,, उद्योजक जितेंद्र तोरणे,, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अखिल महा.संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ मा.भागचंद औताडे सर,, मा.व्यस्थापक अहमदनगर जिल्हा बँक श्रीरामपूरचे मा.नानासाहेब रेवाळे साहेब,,सुभाष तोरणे यां सर्वाच्या हस्ते श्री. दिपक कदम यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.