हरिहर केशव गोविंद बनात उमेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोध्दार उत्साहात पार पडला .

हरिहर केशव गोविंद बनात उमेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोध्दार उत्साहात पार पडला .
हरिहर केशव गोविंद बनात उमेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोध्दार उत्साहात पार पडला .

श्रीरामपूर तालूक्यातील श्री क्षेत्र बेलापूर खुर्द येथील हरिहर केशव गोविंद बनातील पूरातन घाटाजवळ
असलेल्या उमेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोध्दारा निमीत्त प पू मोहन काका खानवेलकर यांच्या मार्गदर्शनात तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . स्वतः पार्वती मातेने महादेवांनी बिडालाक्ष राक्षसाचा वध केला मुळे संतुष्ट होउन हे शिवलिंग स्थापन केले होते . पुर्वीचे छोटेसे मंदिर मोडकळीस आल्यामुळे प.पू मोहन काकांच्या मार्गदर्शनात धर्मप्रिय युवकांनी एकत्र येत या मंदिराच्या जीर्णोध्दाराचा उपक्रम हाती घेतला व सुमारे ७ महीन्यात या मंदिराची उभारणी झाली .पंढरपूरवरून  अतिशय सुबक आकारात शिवलिंग व नंदी मुर्ती आणण्यात आल्या तर उमा देवी ( पार्वती ) व गणपतीच्या मूर्ती राजस्थानमधून मागवण्यात आल्या .
  मंगळवार २ जानेवारी रोजी हभप वीर महाराजांच्या अधिपत्याखाली दैवत मुर्त्यांची टाळगजरात  सजवलेल्या रथात मिरवणूक काढण्यात आली . तर बूधवार  3 जानेवारी रोजी अग्निस्थापना वास्तु प्रतिष्ठा ध्वजस्थापना धान्यदिवस  मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात कोपरगाव बेट येथील श्री संत जनार्दन स्वामी मठाधिपती महंत रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता तसेच हरिभक्त परायण वीर महाराज व हभप शुभम महाराज कांडेकर यांनी मार्गदर्शन केले .
गुरुवार ४ जानेवारी रोजी सकाळी हरिहर केशव गोविंद व उमेश्वर देवतांना अभिषेक होऊन सकाळी ११ :००वा हभप शुभम महाराज कांडेकर यांचे श्रीहरी किर्तन झाले  व त्यां नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली . यावेळी मोठया प्रमाणात भाविक उपस्थीत होते. याप्रसंगी श्री क्षेत्र बिल्वतीर्थाची महती कांडेकर महाराजांनी आपल्या किर्तनातून विशद केली . भगवान शंकरांच्या लिंगांबद्दल असलेले गैरसमज त्यांनी खोडून काढले. शंकर पार्वतीच्या या आवडत्या ठिकाणी पवित्रता जपत धार्मिकता वाढीस लागावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . याप्रसंगी हभप वीर महाराज , प.पू. मोहन काका खानवेलकर व इतर भाविक उपस्थित होते .