श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश .
श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश...
आव्हाणे बु :- नुकत्याच घेण्यात आलेल्या एस एस सी माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यामध्ये श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थानी घवघवीत यश मिळविले आसुन विद्यालयाचा सेमी माध्यमाचा निकाल १००% लागला आसुन तर मराठी माध्यमाचा निकाल ९३.१८ % लागला आहे.
सेमी माध्यमात कु.स्वाती संजय बकाल हीने ९४ % गुण मिळवुन प्रथम कु.दिक्षा संजय बुधवंत ९३.६० % व्दितीय तर तृतीय क्रमांक अनुक्रमे कु.साक्षी सोमनाथ ऊर्किडे व चि.श्रेयश आविनाश पाटेकर यांना ९३ % गुण मिळाले तर मराठी माध्यमात कु.दिव्या पोपट शिरसाठ ८७.६० % (प्रथम) चि.अजिंक्य भिवराज वीर ८४.८० %(व्दितीय) कु.कविता सखाराम सोलाट ८३.८० (तृतीय) क्रमांक पटवला आसुन या गुणवंत विद्यार्थाना श्री.एस एम आल्हाट,श्री.व्ही एस फलके,श्री.एस एस भापकर,एस एम पवार,बी आर टाकळकर,एम एस तेलोरे यांचे मार्गदर्शन लाभले या गुणवंत विद्यार्थाचे विद्यालयाचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड.विद्याधर काकडे साहेब,जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे,युवा नेतृत्व पृथ्वीसिंग(भैय्यासाहेब)काकडे, प्राचार्य श्री.कांतेश्वर ढोले,पर्यवेक्षक सुनिल आव्हाड,बाळासाहेब पाटेकर,संभाजी फसले,योगेश देशमुख,रज्जाक शेख,देविदास गि-हे,ज्ञानेश्वर फसले,भारत भालेराव,विष्णु दिवटे,राजेंद्र पोटफोडे,संजय बकाल,महादेव पाटेकर,आनंता ऊर्किडे,गणेश कराड,विजय म्हस्के,आकाश साबळे,रोहन साबळे, संजय बुधवंत यांनी अभिंनदन केले आहे .