खेडले परमानंद शिवारात अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक तणनाशकाची फवारणी करून चार एकर कपाशीची वाट लावली.

प्रतिनिधी :-संभाजी शिंदे खेडले परमानंद, नेवासाा
खेडले परमानंद शिवारात एका अज्ञात इसमाने गट नंबर 255 मध्ये चार एकर कपाशी वर 24D
या तणनाशकाची फवारणी केली.
त्यामुळे इम्रान रमजान इनामदार
या शेतकऱ्यांची चार एकर कपाशी जायबंदी झाली आहे.
सदर घटनेबाबत सोनई पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 427 प्रमाणे जाणीवपूर्वक शेतमालाचे नुकसान केल्याची फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
घटनास्थळी सहाय्यक कृषी अधिकारी, कामगार तलाठी त्याचप्रमाणे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष दगुबाबा हवालदार यांनी भेट देऊन पाहणी केली.
कृषी सहाय्यक यांनी पाहणीत हे निष्पन्न केले की सदरचे नुकसान तणनाशका मुळेच झाले आहे आहे.
घटनास्थळी सोनई पोलीस प्रशासनाने पाहणी करत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.