राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्य कमिटी सदस्य पदी नानासाहेब जुंधारे यांची निवड.
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांचे निष्ठावंत असणारे मांजरी येथील नानासाहेब जुंधारे यांची पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य पदी नुकतीच निवड झाली
सामान्य कुटुंबातील शेतकरी वर्गातून राजकीय सामाजिक कार्याचे धडे गिरवीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून काम करीत होते 2013 मध्ये तालुका उपाध्यक्ष राहुरी म्हणून निवड झाली ते आज 2026 पर्यंत पक्षामध्ये अनेक पदावर त्यांनी काम केले राहुरी तालुकाध्यक्ष, युवक जिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर, जिल्हा संपर्कप्रमुख इत्यादी पदावर पक्षाच्या संघटनात्मक काम त्यांनी केले तर जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी संस्थापक तालुका उपाध्यक्ष अशा विविध पदावर त्यांनी काम केले
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य कमिटी यादी जाहीर केली त्यामध्ये नानासाहेब जुंधारे यांची निवड केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील मित्रपरिवार व पक्षाचे कार्यकर्त्यांनी,नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले








