*पाथर्डी पोलिसांची मोठी कारवाई; चोरट्याकडून तब्बल 16 मोबाईल हस्तगत*

*पाथर्डी पोलिसांची मोठी कारवाई; चोरट्याकडून तब्बल 16 मोबाईल हस्तगत*

*पाथर्डी पोलिसांची मोठी कारवाई; चोरट्याकडून तब्बल 16 मोबाईल हस्तगत*

*पाथर्डी, अहिल्यानगर*: पाथर्डी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत एका चोरट्याकडून चोरीचे 16 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.

पाथर्डी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीकडून वेगवेगळ्या कंपनीचे 16 स्मार्टफोन जप्त करण्यात आले असून, त्यांची अंदाजे किंमत लाखोंच्या घरात आहे.

सदर मोबाईल फोन शहरातील विविध भागातून चोरीला गेले होते. पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरीच्या घटनांना आळा बसणार असून, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आरोपीकडे अधिक चौकशी सुरू असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.