राहुरी शहरात पहाटेच 'न्यू नाकोडा स्वीट्स अँड फरसाण' दुकानाला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला*

राहुरी शहरात पहाटेच 'न्यू नाकोडा स्वीट्स अँड फरसाण' दुकानाला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला*

*राहुरी शहरात पहाटेच 'न्यू नाकोडा स्वीट्स अँड फरसाण' दुकानाला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला*

*राहुरी, दि. 9 मे 2026*: राहुरी शहरातील मुख्य बाजारपेठेत आज पहाटे 'न्यू नाकोडा स्वीट्स अँड फरसाण' या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

'द फिश गॅलरी' व 'साईप्रसाद ज्वेलर्स' यांच्या मधोमध असलेल्या या दुकानातून पहाटे धूर येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी तातडीने राहुरी नगरपरिषद अग्निशमन दलाला कळवले. MH-17 AG 4570... क्रमांकाचा बंब काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाला. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. शेजारील दुकानांपर्यंत आग पसरण्यापूर्वीच ती विझवल्याने मोठे नुकसान टळले. दुकानातील फ्रीज, काउंटर व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. 

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. राहुरी पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून नुकसानीचा पंचनामा सुरू आहे.