*अहिल्यानगरमध्ये खासगी क्लासेसचा सुळसुळाट; कॉलेजांना बाहेरून ॲडमिशन घेऊन दिवसभर क्लास चालवण्यावर कारवाईची मागणी*
*अहिल्यानगरमध्ये खासगी क्लासेसचा सुळसुळाट; कॉलेजांना बाहेरून ॲडमिशन घेऊन दिवसभर क्लास चालवण्यावर कारवाईची मागणी*
*अहिल्यानगर*: शहरात खासगी क्लासेसचा सुळसुळाट वाढल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही कॉलेजांकडून बाहेरून ॲडमिशन घेऊन विद्यार्थ्यांना दिवसभर खासगी क्लासेससाठी पाठवण्याची परवानगी दिली जात असल्याचा आरोप होत आहे.
शैक्षणिक तज्ज्ञ आणि नागरिकांकडून याबत नाराजी व्यक्त होत असून, अशा कॉलेज आणि क्लासेसवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट भरकटत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित संस्थांची चौकशी करावी आणि नियमबाह्य पद्धतीने चालणाऱ्या खासगी क्लासेस व कॉलेजांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
⚠️ _Ahilyanagar Education Update_ ⚠️
खासगी क्लासेसचा सुळसुळाट
कॉलेजांकडून बाहेरून ॲडमिशन घेऊन दिवसभर क्लास
कारवाईची मागणी
_अहिल्यानगरमध्ये शिक्षणाचा बाजार?
खासगी क्लासेससाठी कॉलेजांकडूनच ॲडमिशनची परवानगी?
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न... कारवाई होणार का?_
राहुरी तालुका प्रतिनिधी देवेंद्र शिंदे









