शेतकऱ्यांना विनाअट सरसकट 2 लाख कर्जमाफी द्या ; महाडीक यांच्याकडे लांबे यांनी केली मागणी .
शेतकऱ्यांना विनाअट सरसकट 2 लाख कर्जमाफी द्या महाडीक यांच्याकडे केली लांबे यांनी मागणी
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री कृष्णराजजी महाडीक यांचे युवाशक्ती जागर यात्रे निमित्त संपूर्ण राज्यात दौरे चालू आहे.शुक्रवारी त्यांचा दौरा आहिल्या नगर जिल्ह्यात असताना त्यांनी शनिशिंगणापूर येथे शनि देवाचे दर्शन घेऊन राहुरी रोडवर ब्राम्हणी उंबरे नंतर दुपारी पिंपरी अवघड येथील सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाय चेअरमन सदस्य सह युवा कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष कृष्णराजजी महाडीक यांचे जंगी स्वागत केले.प्रदेशाध्यक्ष यांच्या स्वागतासाठी सर्व पक्षीय युवा कार्यकर्ते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी निवडणुकी वेळी जाहीर केलेली कर्जमाफी.देण्याचा निर्णय घेतला परंतु त्यामध्ये असलेल्या काही जाचक अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वीनाअट सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी करून पिकविमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा व नवीन कर्ज पुरवठा करुन कष्टकरी शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराजजी महाडीक यांच्याकडे मा सरपंच शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी केली.
यावेळी राहुरी तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रभाकर हरिचंद्रे.चेअरमन मच्छिंद्र लांबे, उपसरपंच शिवाजी लांबे.मा उपसरपंच लहानुभाऊ तमनर,मा.सरपंच अनिल दोंड.संचालक अर्जुन बाचकर.बाळासाहेब लांबे.भाऊसाहेब लांबे, आदीनाथ दोंड.रायभान धसाळ.काशिनाथ दोंड.चांगदेव महाराज लांबे.रामदास धसाळ. जालिंदर पवार.हसन पठाण,राजेंद्र लांबे. अंतवन गायकवाड.अनिल धसाळ.बबन शेख.बादशहा शेख.जमीर पठाण.मिनीनाथ पवार महाराज,सनी पटारे, अमोल लांबे.विजय लांबे.विजय पवार.कृष्णा लांबे.जयहिंद लांबे.चंदर गायकवाड.विलास गायकवाड.संजय वाघमारे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.








