देसवंडी येथे क्रॉपसेप योजनेअंतर्गत ऊस शेती शाळेचा उत्साहात शुभारंभ
*देसवंडी येथे क्रॉपसेप योजनेअंतर्गत ऊस शेती शाळेचा उत्साहात शुभारंभ*
: कृषी विभागाच्या क्रॉपसेप (Cropsap) योजनेअंतर्गत मौजे देसवंडी येथे ऊस पिकातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने ऊस शेती शाळेचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री. बापूसाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

या शेती शाळेसाठी २५ ऊस उत्पादक शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना हंगामभर सहा प्रशिक्षण वर्गामध्ये त्यांना ऊस पिकातील आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, पिकाचे नियमित निरीक्षण, शेतातील समस्या ओळखण्याची क्षमता, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे कौशल्य तसेच ऊस उत्पादकता घटण्यामागील कारणांचा अभ्यास करून त्यावरील प्रभावी उपाययोजनांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक कृषी अधिकारी श्री. शरद लांबे यांनी केले. त्यांनी शेती शाळेची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग याबाबत माहिती दिली.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री. अशोक गिरगुणे यांनी कृषी विभागाच्या विविध मोहिमा, ऊस पिकातील हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. प्रशांत तरंगे यांनी ऊस लागवडीच्या सुधारित पद्धती, योग्य अंतर, बियाण्यांची निवड आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक तांत्रिक बाबींची माहिती दिली.
या कार्यक्रमास श्री. प्रदीप शिरसाठ, श्री. वेणुनाथ कोकाटे, श्री. अंकुश बोर्डे, श्री. सुभाष कल्हापूरे, श्री. प्रज्वल कल्हापूरे, श्री. प्रकाश गागरे, श्री. अशोक शिरसाट, श्री. दीपक कोकाटे, श्री. संपत शिरसाट, श्री. आदिनाथ कोकाटे, श्री. प्रवीण कल्हापूरे, श्री. गणेश कल्हापूरे, श्री. रमेश कोकाटे, श्री. पवन कल्हापूरे, श्री. सचिन कल्हापूरे, श्री. निलेश कल्हापूरे, श्री. संदीप इंगोले, श्री. संतोष शिरसाठ, श्री. ज्ञानदेव शिरसाठ, श्री. गणेश पवार, श्री. दीपक कल्हापूरे, श्री. दत्तात्रय शिरसाठ, श्री. नवनाथ कोकाटे, श्री. सुधाकर शिरसाट, श्री. अभिषेक कल्हापूरे, श्री. सागर शिरसाट , श्री रामचंद्र शिरसाट यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनवाढ आणि खर्चात बचत साध्य करण्याच्या दृष्टीने ही शेती शाळा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, शेतकऱ्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.








