पिंप्री अवघड येथे 'खेत बचाव अभियान ' उत्साहात संपन्न .

पिंप्री अवघड येथे 'खेत बचाव अभियान ' उत्साहात संपन्न .

*पिंप्री अवघड येथे ‘खेत बचाव अभियान’ उत्साहात संपन्न* -

              एल निनो, कपास कांती अभियान, महा विस्तार AI व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी अवघड येथे “खेत बचाव अभियान” यशस्वीरित्या संपन्न झाले. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, मृदा आरोग्य संवर्धन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमास डॉ. जितेंद्र दोरगे सर, डॉ.संजय तोडमल सर,डॉ. कावेरी सोनवणे मॅडम, मंडळ कृषी अधिकारी श्री. अशोक गिरगुणे, कृषी पर्यवेक्षक सौ. सोनाली मोरे मॅडम, सरपंच श्री. सुरेशराव लांबे, उपसरपंच श्री. शिवाजी लांबे तसेच ग्रामस्थ प्रतिनिधी श्री. बापू तमनर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सुरुवातीला डॉ. दोरगेसरांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर

 

           डॉ. संजय तोडमल यांनी “जमिनीचे आरोग्य व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी मृदा परीक्षणाचे महत्त्व, संतुलित खत व्यवस्थापन, सेंद्रिय व रासायनिक खतांचा समन्वित वापर, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व तसेच पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.

 

          मंडळ कृषी अधिकारी श्री. अशोक गिरगुणे यांनी- शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी राहुरी यांचे मार्गदर्शनाखाली कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध मोहिमा व योजनांची माहिती दिली. त्यांनी "कपास कांती" अभियान, महा विस्तार AI या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक प्रभावी सेवा उपलब्ध होत असल्याचे सांगितले. तसेच संभाव्य एल निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक नियोजन, पाण्याचा कार्यक्षम वापर, हवामानानुसार पीक व्यवस्थापन, आंतरमशागत व जोखीम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.

 

           याशिवाय पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण करणे, पीक नोंदणी, महाडीबीटी पोर्टलवरील विविध अनुदान योजना तसेच कृषी विभागाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी शेतकरी बांधवांना केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील कृषी सहाय्यक श्री. दिलीप कल्हापुरे, श्री. सतीश कदम, श्री. संभाजी निमसे, श्री. अमोल निमसे तसेच कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. राजेंद्र गाढे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

         या प्रसंगी श्री. रमेश दौंड, श्री. साईनाथ दौंड, श्री अर्जुन सोडनर, श्री. अविनाश लांबे, श्री. दीपक लांबे, श्री. निलेश लांबे, श्री. विजय लांबे, श्री बबन बाचकर श्री. दिलीप लांबे, श्री. अभिजीत गटकळ, श्री. उल्हास वराळे, श्री. विलास दौंड, श्री. पंडित लांबे, श्री. राजेंद्र पवार, श्री. गणेश लांबे, श्री. बाळासाहेब सोडनर, श्री. पुंजाहरी सोडनर, श्री. रामदास होडगर, श्री. महेंद्र लांबे, श्री. योगेश दौंड, श्री. संतोष पिंगळे, श्री. ज्ञानदेव लांबे, श्री. किरण कांबळे, श्री. विकास लांबे, श्री. जगन्नाथ दौंड, श्री. महेश गटकळ, श्री. नानासाहेब लांबे, श्री. रमेश लांबे, श्री. संजय लांबे, श्री. विकास पवार, श्री. श्री अनिल धसाळ , श्री राजेंद्र सोडनर , श्री विवेक धसाळ , श्री कमलेश लांबे यांच्यासह अनेक प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

        कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक व्यवस्थापन, मृदा आरोग्य संवर्धन तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांबाबत उपयुक्त माहिती मिळाली. उपस्थित शेतकऱ्यांनी अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सरपंच श्री सुरेशराव लांबे यांनी आपले मनोगत व्यक्त करून कृषी विद्यापीठ व कृषी विभागाचे आभार मानले .

“सुदृढ माती – समृद्ध शेती – सक्षम शेतकरी”

या संदेशासह कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.