बहुजन विकास कृति समिति वरवंडी च्या वतिने बुद्ध विहार वरवंडी मध्ये राजमाता आहिल्याबाई होळकर जयंति साजरी
बहुजन विकास कृती समिती वरवंडी यांच्या वतीने सकाळी ८.३० वा. बुद्ध विहार मध्ये आज दिनांक 31/5/2022 रोजी राष्ट्रमाता, राजमाता, कुशल प्रशासक, महाराणी अहिल्याबाई होळकर यांची 297 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रमानिमित्त सरपंच भाऊसाहेब कोळेकर ग्रामपंचायत सदस्य सलीम भाई शेख, जगदीश भालेराव तसेच दिगंबर ताकटे, संजय अडसुरे, जावेद शेख,कोंडीराम बाचकर, लक्ष्मण बरे, परभात बरे, अशोक आयनर, अशोक बरे, पप्पू बरे, नारायण बरे, संतोष थोरात, माऊली बरे, संदीप बाचकर, सलमान शेख, जालिंदर आडसुरे, आदिनाथ आडसरे,अक्षय पवार, आकाश पवार, राघू येळे, संभा गर्दे, मिनीनाथ आगळे, सुधाकर आढाव, शांतवन पवार, परसराम अडसुरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
जयंतीपर अभ्यासपूर्वक विचार श्री जालिंदर भाऊसाहेब आडसुरे, कोंडिराम बाचकर, परभत बरे यांनी मांडले तसेच सर्वांना जयंतीपर समाज बांधव व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
मा. ग्रामपंचायत सदस्य जगदिश भाऊसाहेब भालेराव यांनी आहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्याचा आढावा व अभ्यासपूर्वक मार्गदर्शन केले.,
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय विलास भालेराव यांनी केले प्रास्ताविक सुनिल रावसाहेब भालेराव यांनी केले तरआभार रविंद्र भागवत भालेराव यांनी मांडले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरक्षनाथ नामदेव भालेराव, नारायण मैनाजी शिंदे, अक्षय संजय पवार, बंडू रावसाहेब भालेराव यांनी मोलाचे सहकार्य केले.