शनिशिंगणापूर येथे चौथर्‍यावर जाऊन महिलांनी केला शनी देवाचा तेलाचा अभिषेक.

शनिशिंगणापूर येथे चौथर्‍यावर जाऊन महिलांनी केला शनी देवाचा तेलाचा अभिषेक.

प्रतिनिधी संभाजी शिंदे ,खेडले परमानंद

अहमदनगर जिल्ह्यातील तसेच देशभरात गाजलेले शनैश्वर देवस्थान हे विश्वस्तांच्या निर्णयामुळे पुन्हा चर्चेत आले आहे .संपूर्ण देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने भाविकांना चौथऱ्यावर जाऊन अभिषेक करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे .दि .18 जून पासून भाविकांना श्री शनेश्वर देवस्थान येथे चौथऱ्यावर जाऊन अभिषेक करण्यास ट्रस्टच्या विश्वस्तांनी परवानगी दिली आहे .

या निर्णयानुसार ज्या भाविकांना शनि देवास तेल अभिषेक करावयाचा असेल अशा भाविकांना श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टची 500 रुपयाची पावती घेऊन शनि चौथऱ्यावर अभिषेक करता येणार आहे .

तेल अभिषेक पावती करता देवस्थानचे तेल विक्री काऊंटर,देणगी काउंटर तसेच जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी व्यवस्था करण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष. श्री भागवत बानकर यांनी सांगितले आहे .

 

     BPS LIVE NEWS चे प्रतिनिधी संभाजी शिंदे यांनी या निर्णयासंदर्भात भाविकांशी चर्चा केली असता भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केल्याचे निदर्शनास आले आहे .