9 ते 10 महिन्यापासून एकच शिक्षकावर शाळेचा कारभार
बी. पी. एस. लाईव्ह न्युज सोलापूर,
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे.
बार्शी- (ता.बार्शी). कोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा पूर्ण कारभार एकाच शिक्षकावर चालू आहे. या शाळेत विद्यार्थी 70 ते 75 असून पूर्ण कामकाज एकच शिक्षक पाहत आहेत.
यामध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप कोरेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून केला जात आहे.
कोरेगाव शाळेत पहिली ते चौथी चे पूर्ण वर्ग एकाच शिक्षकाला सांभाळावी लागत आहेत. 30 मे 2021 रोजी एक शिक्षक सेवानिवृत्त झाले तेव्हापासून 9 ते 10 महिन्यापासून कोरेगाव जिल्हा परिषद शाळेत एकाच शिक्षकाचे काम चालू असल्यामुळे सर्व वर्गाला पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्याचे मी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
जिल्हा परिषद शाळा या खेडोपाडी गावात चालवली जातात कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांची चांगली सोय होते पण असे न होता यामध्ये उलट विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
.कमीत कमी या जिल्हा परिषद शाळेत किमान प्रत्येकी वर्ग- एक शिक्षक असले पाहिजे. किमान अजून 3 तरी शिक्षकाचे तात्काळ नेमणूक करावी.
अन्यथा 4 मार्च 2022 रोजी कोरेगाव जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून कुुलुुप लावण्यात येईल व याला जबाबदार प्रशासनाला ठरविण्यात येईल.
असे कोरेगाव मधील पालक बळीराम ढाकणे यांनी सांगितले.