*लहान मुले पळवून नेणाऱ्या टोळ्यांची अफवा: अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी -सम्मेद तरटे
सोलापूर- ग्रामीण भागात लहान मुले पळवून नेणाऱ्या टोळीची अफवा पसरली जात आहे तरीही गावांमध्ये अथवा इतरत्र कसल्याही प्रकारचे संशयित लोक आढळून आल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता 112 या टोल फ्री नंबर वर संपर्क साधावा किंवा पोलीस स्टेशन येथे कळवावे.
यामध्ये गावातील पोलीस पाटील यांना सतर्कतेने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. काही अफवाखोर लोक सोशल मीडियावर अशा खबरी टाकत आहेत पण पोलीस रेकॉर्डमध्ये अद्यापही अशी कुठलीही टोळी आली नाही असे वक्तव्य सोलापूर जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी केले.
काही लोक व्हाट्सअप वरचे स्क्रीन शॉट टाकून त्यामध्ये दहा ते बारा जणांची टोळी आहे व लहान मुलांना गोळ्या बिस्कीटचे अमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न करत आहेत असे लिहून मेसेज व्हायरल करत आहेत. तरीही सध्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची टोळी पोलीस प्रशासनाला मिळाली नाही तरीही नागरिकांनी यावर विश्वास न ठेवता काही संशयित आढळल्यास त्वरित 112 या टोल फ्री नंबर वर संपर्क साधावा याकरिता पोलीस प्रशासन खंबीरपणे सतर्क, सक्षम तयार आहे. असे आवाहन ग्रामीण व शहर पोलीस यांनी केली आहे.