देवळाली प्रवरा येथील दाम्पत्याला फार्मासिटिकल रसायनशास्त्र पीएचडी प्राप्त.

देवळाली प्रवरा येथील दाम्पत्याला फार्मासिटिकल रसायनशास्त्र पीएचडी प्राप्त.

प्रतिनिधी:- वळण

देवळाली प्रवरा येथील दांपत्याल डॉक्टरेट पदवी प्रदान. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात असणारे प्रवीण बाळासाहेब चोळके, व त्यांची पत्नी योगिता प्रवीण चोळके या दांपत्यास फार्मासीटिकल शास्त्र या विषयात अजमेर येथील भगवंत विद्यालयाच्या वतीन प्रा .डॉ. नचिकेत शंकर दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर म्हणजे पीएचडी पदवी बहाल करण्यात आली.

       पीएचडी पदवी प्राप्त झाल्यामुळे परिसरात या दांपत्याचे मोठे कौतुक होत आहे. अनेक सामाजिक संघटनांनी यांचा यथोचित सन्मान केला. यामध्ये यात्रा कमिटीचे सदस्य देवराम कडू, हिंदू रक्षक धर्म परिषद धार्मिक व सामाजिक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता पाटील गागरे, बाळासाहेब चोळके, डॉक्टर संतोष चोळके, रमेश चोळके, सुनील चोळके, डॉक्टर विद्या पळसकर, सुरेश खिलारी वळण, सुरेश पठारे, विक्रम विखे, बापू कडू, विषाल कडू, ज्योती गागरे, पुष्पा घोळके आदी मान्यवरांनी या दाम्पत्यांचा सत्कार केला. व सार्थ अभिमान व्यक्त केला

      या यशाबद्दल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार अशोक पवार, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, चैतन्य उद्योगसमूहाचे अध्यक्ष गणेश भांड, वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान चे संस्थापक वसंत कदम, संदीप कदम, शिवसेना शहर प्रमुख, सुनील कराळे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, मांडवगण चे सरपंच शिवाजी कदम, दैनिक लोकमतचे पत्रकार शरद खिल्लारी,  भारत खिलारी, लक्ष्मण खिलारी त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील अनेक गावचे सरपंच उपसरपंच व सामाजिक संस्था यांनी या दाम्पत्याचे सत्कार समारंभ त्याचप्रमाणे कौतुक केले आहे

एक शेतकरी सर्वसामान्य कुटुंबात असूनही या दाम्पत्याने समाजापुढे मोठा आदर्श ठेवला आहे...