एन.सी.सी. च्या राज्य स्तरीय कँम्प साठी कस्तुरबा विद्या मंदिर,सेवाग्राम च्या कँडेट्स ची निवड .

एन.सी.सी. च्या राज्य स्तरीय कँम्प साठी कस्तुरबा विद्या मंदिर,सेवाग्राम च्या कँडेट्स ची निवड .

एन.सी.सी. च्या राज्य स्तरीय कँम्प साठी कस्तुरबा विद्या मंदिर,सेवाग्राम च्या कँडेट्स ची निवड

ब्युरो रिपोर्टर - वाहिद शेख

वर्धा जिल्हा विशेष - 21 महाराष्ट्र एन सी सी बटालियन , वर्धाच्या सबयुनिट असलेल्या कस्तुरबा विद्या मंदिर , सेवाग्राम येथील कैडेट कु.श्रुति प्रशांत मानकर व कँडेट अर्जुन किशोर पिसुड्डे यांची औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्य स्तरीय (एक भारत ,श्रेष्ठ भारत) या एन सी सी कँम्प मध्ये निवड झाली.

हा कँम्प 3 महाराष्ट्र गल्स बटालियन , नागपूरच्या नेतृत्वात लेफ्टनंट प्रा बाळासाहेब लाड , लान्सनायक गजेन्द्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रुप 14 नोव्हेंबर 2022 ला नागपूर पुणे एक्सप्रेसने रवाना झाले . सदर कँम्प 15 ते 24 नोव्हेंबर 2022 पर्यंत आयोजित केला आहे . या मध्ये परेड, ग्रूप डिस्कशन , खेळ , सांस्कृतिक कार्यक्रम , शिस्त , विशेष तज्ञ कडून विषयाचे ज्ञान , मनोरंजन , मँँप रिडींग , शस्त्र प्रशिक्षण , क्षेत्रभेटी ,विविध स्पर्धाचे आयोजन आदीचा सहभाग आहे .

कठीण आणि उत्कृष्ट प्रशिक्षण प्राप्त केल्यामुळे सदर कँडेट ची निवड झाली आहे . दोन्ही कँडेट नी या आधी दहा दिवसीय एन सी सी वार्षिक प्रशिक्षण कँम्प मध्ये सहभाग घेतला होता . सदर कँम्प मध्ये निवड झाल्या बद्दल 21 महाराष्ट्र बटालियन चे प्रशासकीय अधिकारी कर्नल मुरुगेशन , एन सी सी अधिकारी उमेश गायकवाड यांनी कँडेट चे अभिनंदन केले . विद्यार्थ्यांनी निवडीचे श्रेय बटालियन चे अधिकारी कर्नल मुरुगेशन , एन सी सी अधिकारी उमेश गायकवाड , मुख्याध्यापिका श्रीमती डायगवाने व आपल्या आईवडिलांना दिले आहे .