चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल सलबतपुर चे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी.

चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी.
नेवासा ( प्रतिनिधी युनूस पठाण) नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व तसेच उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेली चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025 मोठ्या उत्साहामध्ये पार पाडला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून महाराष्ट्राचे छोटे पुढारी सिने अभिनेते बिग बॉस फेम घनश्याम दरवडे हे उपस्थित होते. व तसेच या महोत्सवामध्ये 'रायरेश्वराची शपथ'हे महानाट्य सादर करण्यात आले या महानाट्यमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वावरून व्यासपीठावर आगमन झाले . या महानाट्याला उपस्थित पालकांची खूपच वाहवा मिळवली. तसेच पौराणिक प्रसंग,शेतकरी नृत्य, खंडोबाचे चांगभले ,विठ्ठल महिमा ,श्रीराम गीते ,दाताचं दातवन, लावणी नृत्य, शेतकरी नृत्य, संत गोरा कुंभार यांच्या विठ्ठल भक्तीचा देखावा, अशी एकास एक सदाबहार गीते विद्यार्थ्यांनी सादर केली त्यामुळे सेनेहसंमेलनाची रंगत खूपच वाढली.
छोटा भीम, मिकी माऊस ,बलून डेकोरेशन देखणी विद्युत रोषनाई, टेडी बियर सेल्फी पॉईंट, खवय्यांसाठी विविध खाद्यपदराचे स्टॉल लावण्यात आलेले होते.
स्नेहसंमेलनासाठी सलाबतपुर, गी डेगाव,शिरसगाव, वरखेड, माळेवाडी, सुरेगाव, गळलिंब,खेडले काजळी,जळके, गोंडेगाव ,दिघी ,भोसले बाभूळखेडे, या गावांमधून पालक व माता पालक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन बाळासाहेब निकम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सलाबतपुरचे सरपंच अजहर शेख, ह.भ.प. अशोक महाराज साळुंके, अहिल्यानगर कॉलेजचे प्रा. विजय कदम सर, आप्पासाहेब गोरे, भाऊसाहेब गोरे, आसिफ पटेल, सुरेश देवा जोशी, अमोल कदम, प्राचार्य विठ्ठल कदम सर, प्राचार्य विजय नाबदे सर, सुरेश देवा जोशी, सुनील नजण,भास्कर गोरे, संस्थेचे सचिव मनोहर बनसोडे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी छाया निकम, उमा कुऱ्हाडे,रेणुका गोरे, छाया लालझरे ,सोनाली सय्यद ,सुप्रिया लिंबे, नीता परदेशी, मीनाक्षी तांबे, पमाबाई जाधव,श्री. शाहरुख सय्यद,संजय गरुटे, संतोष निकम, कैलास तांबे, निलेश निधाने, अशोक मगर, विजय साळुंके यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनूस पठाण यांनी केले.प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा.सागर बनसोडे यांनी केले . शेवटी आभार प्राचार्य रवींद्र गावडे सर यांनी मानले.