बालाजी देडगाव येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा.
बालाजी देडगाव - (प्रतिनिधी युनूस पठाण) नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संस्थापक मा. पवन राजे सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश उत्तर अध्यक्ष प्रमोद थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व एकलव्य संघटना देडगाव यांच्या वतीने जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एकलव्याच्या प्रतिमेचे पूजन करून जोरदार घोषणा देण्यात आल्या. यानंतर युवा नेते निलेश कोकरे, बळिराजा संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, एकलव्य संघटनेचे पदाधिकारी गणेश मोरे ,पत्रकार युनूस पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले व जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व सांगत आदिवासी समाजाने आता शिकले पाहिजे, संघटित झालं पाहिजे यानिमित्ताने हीच शिकवण असेल असा संकल्प यावेळी केला.
यानंतर गावभर सर्व आदिवासी बांधवांच्या व सर्व जाती धर्माच्या उपस्थितीमध्ये गावभर शांततेत मिरवणूक काढण्यात आली. तर ही मिरवणूक व्यसनमुक्त करण्यात आली हे वैशिष्ट्य ठरले.फटाक्याच्या आतषबाजी मध्ये व वाजत गाजत मिरवणूक संपन्न झाली. यावेळी एकलव्य संघाचे पदाधिकारी यांचा निलेश भाऊ कोकरे युवा मंचाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमानिमित्त भाजपा युवा मोर्चाचे आकाश भाऊ चेडे, युवा नेते श्रीकांत हिवाळे, युवा नेते आशिष हिवाळे, युवा नेते विलासराव मुंगसे,महेश चेडे, हिरामण फुलारी, एकनाथ आव्हाड, व्यावसायिक संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश लाड ,असलम पठाण , सचिन हिवाळे ,फकीचंद हिवाळे ,सिमोन दळवी, पिनु काळे ,एकलव्य संघाचे शहर अध्यक्ष कृष्णा मोरे, रघु काटकर , भोरू काटकर ,बारकू काटकर ,विलास मोरे ,ज्ञानेश्वर मोरे ,अमोल मोरे ,विजय मोरे ,गणेश गायकवाड ,विठ्ठल बर्डे,गोरख माळी ,पांडुरंग मोरे, बहिरू गायकवाड आदी आदिवासी समाजातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित हो
ते.