विद्यार्थी व शिक्षक यांचे अतूट नात गुरु व शिष्याचं असतं प्रत्येकात कृतज्ञता हा गुन्हा असावा :- सुनील जायभाय

विद्यार्थी व शिक्षक यांचे अतूट नात गुरु व शिष्याचं असतं प्रत्येकात कृतज्ञता हा गुन्हा असावा :- सुनील जायभाय

विद्यार्थी व शिक्षक यांचे अतूट नातं गुरु व शिष्याचं असतं प्रत्येकात कृतज्ञता हा गुण असावा-सुनील जायभाय 

 

भारत भालेराव

ग्रामीण प्रतिनिधी,

 

आव्हाणे बु: दि ५श्रीराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरजळगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील इ 8वी,10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यानी शिक्षकांची भूमिका बजावत प्रत्यक्ष अध्यापनाचा आणि शालेय प्रशासनाची धुरा सांभाळत अनुभव घेतला.

अभिवादन सभेत भारताचे उपराष्ट्रपती डॉ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यार्थी शिक्षकांच्या वतीने शिक्षकाचा यथोचित सन्मान करण्यात आला.विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे व पर्यवेक्षक सुनील जायभाये यांनी सर्व शिक्षकांना दशसूत्री प्रतिज्ञेची शपथ दिली.विद्यालयातील विद्यार्थी अनमोल बोरुडे,हर्षदा वाकडे,प्रगती कराड,गिरिजा देशमुख,साईराज केदार,भावेश बडे,प्रणव गिऱ्हे विद्यार्थी मुख्याध्यापिका कु चेके प्राजक्ता अंजली व कु लबडे अंजली, विद्यार्थी उपमुख्याध्यापक हर्षदा वाकडे,विद्यार्थी पर्यवेक्षक विशाल नन्नवरे,ऋषिकेश गिऱ्हे यांनी आपल्या मनोगतात शिक्षक दिनाचे महत्व पटवून देत शिक्षक हा समाजाच्या पाठीचा कणा आहे.असा शिक्षकांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करत दिवसभर अध्यापन करताना आलेले अनुभव आणि शिक्षकाची भूमिका बजावताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य यांनी समाजव्यवस्थेमध्ये राष्ट्र उभारणीच्या कार्यात शिक्षकाचा हातभार कसा लागतो हे विस्तृतपणे सांगितले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पर्यवेक्षक सुनील जायभाये यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी जीवनातील गुरुचे महत्व समजावून सांगितले आणि भारतवर्षातील गुरू शिष्य परंपरा समजावून सांगत विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती आदर बाळगावा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका कु.वैष्णवी पालवे,भाग्यश्री बडे,श्रुती देशमुख यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी शिक्षिका पूजा लांडे यांनी केले.कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये,संस्था प्रतिनिधी सुरेश तेलोरे यांचेसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.