" अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी आरोपीस दोन वर्षे सक्तमजुरी व ५००० / - रुपये दंडाची शिक्षा "

" अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी आरोपीस दोन वर्षे सक्तमजुरी व ५००० / - रुपये दंडाची शिक्षा "

अहमदनगर : आरोपी नामे शुभम आप्पासाहेब दिघे वय - २२ वर्षे , रा . मोती नगर , केडगांव , ता . जि . अहमदनगर याने अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी मा . विशेष न्यायाधीश श्रीम . एम . एच . मोरे साहेब यांनी दोषी धरले व त्यास भा.द.वि.का.कलम ३५४ ( ड ) सह बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा कलम १२ नुसार दोषी धरून दोन वर्षे सक्तमजुरी व ५००० रूपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली . सदर खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी कामकाज पाहिले . सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि , अंबिका नगर केडगांव येथे राहणारी पिडीत अल्पवयीन मुलगी हिने कोतवाली पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली . फिर्यादीनुसार ती आरोपी यास फिर्याद देणेपूर्वी चार ते पाच महिन्यांपासून ओळखत होती . आरोपी हा तिचा गेल्या अनेक महिन्यांपासून पाठलाग करित होता . तसेच बोलण्याचा प्रयत्न करीत होता . तसेच तो तिला म्हणाला की , तु मला खुप आवडते , असे म्हणून तिचेशी नेहमी बोलू लागला . त्यांनतर दि . २७.१०.२०१८ , दि . २४.११.२०१८ तसेच दि . ०१.०१.२०१ ९ रोजी आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलगी हिस धमकी देवून बळजबरीने फिरायला मोटार सायकल वर घेवून गेला व चास येथील एका हॉटेलमध्ये बळजबरीने अतिप्रसंग केला . तसेच या बाबत कुणाला काही सांगितले तर पुर्ण केडगांव मध्ये तुझी बदणामी करील अशी धमकी दिली . अल्पवयीन पिडीत मुलगी पोटात दुखत असल्याने तिने झालेला सर्व प्रकार तिचे आई वडीलांना सांगितला व त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी हि तिच्या आई सह कोतवाली पोलिस स्टेशनला जावून आरोपी शुभम दिघे याचे विरुध्द गु.रं. नंबर ०७ / २०१ ९ दाखल करून भा.द.वि. कलम ३७६ ( आय ) ( एन ) , ३५४ डी , ५०४ , ५०६ तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३,४ व १२ नुसार गुन्हा दाखल केला . सदर गुन्हयाचा तपास सहा.पो.नि. राजेश डी . गवळी यांनी करून मा . न्यायालयात आरोपी विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले . सदरच्या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अल्पवयीन पिडीत मुलगी , पिडीत मुलीची आई , पंच साक्षीदार , मुख्याध्यापक तसेच तपासी अधिकारी इत्यादी साक्षीदार तपासणेत आले . सदरच्या खटल्याची गुणदोषावर सुनावणी होवून मा . न्यायालयाने आरोपी यास भा.द.वि. कलम ३५४ ( डी ) नुसार दोषी धरून आरोपीस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली . सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी काम पाहिले व पैरवी अधिकारी महिला पोलिस उत्कर्षा वडते यांनी सहकार्य केले . अहमदनगर ता . १ ९ / ०७ / २०२२ 

 " ( मनिषा केळगंद्रे - शिंदे ) विशेष सरकारी वकील अहमदनगर . मो.नं .८२०८ ९९ ६७ ९ ५ , ९ ८५०८६०४११