बेलापूर बनात प्रवरा नदीआरतीचा अनोखा उपक्रम

बेलापूर बनात प्रवरा नदीआरतीचा अनोखा उपक्रम
बेलापूर बनात प्रवरा नदीआरतीचा अनोखा उपक्रम

निसर्गाचा होत असलेला ऱ्हास आणी नागरिकांचे त्याकडे होणारे दुर्लक्ष या मुळे सध्या निसर्गचक्र बिघडले आहे. प्राचीन भारतीय सभ्यतेत नदी, वृक्ष, पशुपक्षी यांच्याबद्दल ऋषींमुनींनी अनेक परंपरा घालून दिल्यामुळे हिंदू धर्माद्वारे वसुंधरे ची जपणूक होत असे. अधिक उत्पन्न घेण्यासाठी, आधुनिकीकरण, आणी यांत्रिकीकारणाच्या आगमनाने बेसुमार वृक्षतोड होऊन गायराने व वनराई नष्ट झाल्या. शहरीकरण तसेच उद्योग उभारणी मुळे सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न उभा राहिला आणी मग या गटारी नदीकडे वाळविण्यात आल्या. 1960 नंतर या समस्येने उग्र रूप धारण केले. अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक साखर कारखाने उभे राहिले आणी सर्वत्र नदी जलप्रदूषणाने संपूर्ण जिल्ह्यात संकट उभे केले.
नऊ वर्ष्यांपूर्वी हरिहर केशव गोविंद बनातील काही तरुण एकत्र येऊन केशव गोविंद महात्म्याचे पारायण करत असताना प्रवरा नदीची उत्पती श्रीहरी विष्णुच्या पायापासून झाली असून ती अमृताची धार असून तिच्या काठी अनेक देवी देवतानी शिवलिंग स्थापित केले असल्याचे त्यांच्या वाचनात आले. आपल्या नदीची महती समजल्याने ती स्वच्छ करण्यासाठी जनजागरण करण्याचे त्यांनी प्रयत्न सुरु केले. केशव गोविंद देवस्थान त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणी 6 वर्षांपूर्वी ह भ प वीर महाराज यांच्या आधीपात्याखाली पायी प्रवरा नदीची परिक्रमा सुरु झाली. सुमारे 60 भाविकांनी गावोगावी प्रभोधन करत 21 दिवसात हि परिक्रमा पूर्ण केली. दरवर्षी प्रवरा परिक्रमेचा हा उपक्रम बेलापूर बनातील हरिहर केशव गोविंद देवस्थान राबवत आहे.
या वर्षी 11 ऑगस्ट रोजी तिसऱ्या श्रावण सोमवारी आणखी पुढे जात देवस्थानच्या वतीने प्रवरा माईची आरतीचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात शेकडो भाविकानी सकाळी 7.30 वा प पु मोहनकाका खानविलकर व ह भ प वीर महाराज यांच्या आधिपत्याखाली प्रवरा नदीचे पूजन करून, प्रवरा मातेची ओटी भरण पुरोहित्यांच्या मंत्रोचारात करत, प्रवरा मातेची आरती करण्यात आली. प पु मोहन काका खानविलकर यांनी रचलेल्या आरतीचे योगेश परांजपे व स्वानंदी परांजपे यांच्या आवाजात व कृष्णा कुलकर्णी यांच्या संगीत साथ असलेले ध्वनीमुद्रण या वेळी वाजविण्यात आले.खास गंगा पूजणासाठी आणलेल्या तीन पितळी सहस्त्रआरतीपात्रामुळे मुळे एक अदभूतआणी दिव्य वातावरण निर्माण झाले होते. देवस्थानचे अध्यक्ष, सर्व विश्वस्त व शेकडो भाविक या दिव्य क्षणांचे साक्षीदार झाले. संस्थानने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.