*महाराष्ट्रामध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टी अंगामी निवडणूका सर्व जागा लढवणार ....हरीश चुके प्रदेशाध्यक्ष*

समाज

*महाराष्ट्रामध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टी आगामी निवणुका सर्व जागा लढणार...हरिश उईके प्रदेशाध्यक्ष.*

 बी.पी.एस. राष्ट्रीय न्यूज चैनल दिल्ली

      नागपूर:-दि.12/06/2022 ला सरपंच भवन जिल्हा नागपुर गोंडवाना गणतंत्र पार्टीची आगामी निवडणुकीच्या संदर्भा सहविचार सभा घेण्यात आली.ह्या सभेला महा.प्रदेश अध्यक्ष ति.हरिशजी उईके साहेब अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख अतिथी ति.बळवंतराव मडावी कार्याध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.त्याच प्रमाणे मंचकावर ति.सुखलालजी मडावी प्रदेश उपाध्यक्ष, सुधाकरजी आत्रम प्रदेश महासचिव, सौ. प्रतिमाताई मडावी प्रदेश अध्यक्षा म.प्र,राजेश इरपाते युवा प्रदेश अध्यक्ष,सचिनजी दहिकर ओबिसी शेल प्रदेशाध्यक्ष,व प्रदेश कमिटीचे सर्व पदाधिकारी,जिल्हाचे सर्व जिल्हाध्यक्ष सभेला उपस्थित होते.

सन्माननीय रेखाताई निखोरे भारतीय राष्ट्रिय गोंडवाना पार्टीच्या उच्च पदावर होत्या ह्या पदाचा त्याग करुन नुकताच त्यांनी गोंगपा मध्ये प्रवेश घेउन त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षा महिला प्रकोष्ट प्रदेश अध्यक्षाच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.त्याच प्रमाणे प्रतिकजी सांगोडे यांनी बिएसपीचा त्याग करुन गोंगपामध्ये प्रवेश केला त्यांची सुध्दा प्रदेश प्रचारमंत्री ह्या पदावर नियुक्तीकरण्यात आली.तसेच यवतमाळ यथिल ओबिसी समाजाचे झुंझार कार्यकर्ते विशाल भाऊ वाघ ओबिसी सेल यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.त्याच प्रमाणे सखारामजी मडावींना प्रदेश संघटन मंत्री पद बहाल करण्यात आले.संपुर्ण महाराष्ट्रात आगामी निवडणुका लढविण्याचा निर्धार ति.हरिश उईके प्रदेशाध्यक्ष आणि बळवंतराव मडावी प्रदेश कार्याध्यक्ष यांनी व्यक्त केला.सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्याजिल्हाचा आढावा प्रदेश कमीटीला सादर केला.

 

निवडणुकीवर डोळा ठेउन अनेक पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या ह्या कार्यक्रमाला अनेक गोंगपाचे पदाधिकारी,युवा पदाधिकारी,महिला प्रकोष्ट पदाधिकारी उपस्थित होते.सुत्रसंचालन ति.सुधाकरजी आत्राम प्रदेश महामंत्री तर आभार प्रदर्शन ति.धनराज मडावी जिल्हाध्यक्ष नागपुर यांनि केले..कार्यक्रमाला उपस्थीत सर्व पदाधिका~यांचे मनस्वी आभार. ‌