*राहाता तालुक्यातील रांजणखोल ग्रामपंचायती कडून टिळकनगर कालव्यालगत कपडे धुण्यासाठी घाट बांधण्याच्या कामाचा शुभारंभ:-*
*BPS Live News... Ahmednagar... Prakash Nikale - Reporter - Shrirampur* - 05
दि. ०४/०२/२०२२ रोजी टिळकनगर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याच्या मागील वस्तीतील महिला भगिनींसाठी सोय व्हावी म्हणून रांजणखोल ग्रामपंचायतीच्या दलित वस्ती सुधारणा निधीमधून तेथील महीला रहिवासी यांच्याकरिता कालव्यालगत वापरण्याचे पाणी भरणे व कपडे धुण्यासाठी घाट बांधला जाणार आहे. ₹ ४,००,०००/- या कामासाठी प्रस्तावित आहे. सदरील कामाच्या शुभारंभ प्रसंगी रांजणखोल ग्रामपंचायतीेचे सरपंच श्री. चांगदेव अंबादास ढोकचौळे, उपसरपंच बागुल हे त्या प्रसंगी बीपीएस लाईव्ह न्यूजचे पत्रकार प्रतिनिधी बरोबर बोलतांना माहिती मिळाली, सदरील कामा बाबत तेथील रहिवासी ग्रामपंचायत रांजणखोल आस्थापनेच्या व्यवस्थापकांचे आभार मानत असून सदरील काम पुर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रसंगी सरपंच, उपसरपंच, सिध्दार्थ बागुल, बाळासाहेब ढोकचौळे, शकील भाई पठाण, गणेश आवारे तसेच त्या भागातील रहिवासी उपस्थित होते. याच भागाकरीता यापुर्वी ग्रामपंचायतीने पाणी पिण्याची टाकी बांधली व फिल्टर पाणी व्यवस्था केली आहे.सोबत काही क्षणचित्रे..... *BPS Live News... Ahmednagar... Prakash Nikale - Reporter - Shrirampur*