पोलीस आल्याचे समजताच हनुमान चालीसा वाजविण्याचे आंदोलन करणारे मनसे कार्यकर्त्यांचे पलायन
_मुंबई_ - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीं वरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आज ठिकठिकाणी मनसे सैनिकांनी राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करून मशिदीं समोर हनुमान चालीसा वाजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू केले होते. पण, मुंबई पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले असता मनसेचे नेते संदीप देशपांडे हे पोलीस आल्याचे बघताच कारमधून पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. मात्र यावेळी कारचा जोराचा धक्का एका कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास लागल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. या प्रकरणी पोलिसांनी मनसे पदाधिकारी असणाऱ्या संदिप देशपांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक 3 तारखे नंतर राज ठाकरे यांनी बांग देणाऱ्या प्रत्येक मशिदीं समोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्यभरात पोलिसांनी आधीच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती. मुंबईतही अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना देखील पोलीस ताब्यात घेण्यासाठी गेले होते. पण, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे पोलीस आल्याचे समजताच कारमधून बसून पळून गेले.यावेळी त्यांनी कार भरधाव वेगात चालविल्या मुळे आपले पोलीस कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला या कारची जोराची धडक बसल्याने त्या जागेवरच कोसळल्या होत्या. महिला कर्मचारी खाली कोसळल्या चे बघून देखील संदीप देशपांडे यांनी कार न थांबवता आपल्यां कारचा वेग जोरात वाढवून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण कर्तव्यदक्ष असणारे पोलीस व पोलीस अधिकाऱ्यांनी अखेरीस संदिप देशपांडे याला ताब्यात घेतलेच. तातडीने जखमी पोलीस महिला कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवला आहे. दिलेल्या जबाबावरुन संदिप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर गुन्हा नोंदवायचा की नाही हे सर्व जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या जबाबा नंतर ठरविण्यात येणार आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्यात कोणती - कोणती कलम लावली जातील हे लवकरच स्पष्ट होईल. परंतु सरकारी कामात अडथळा आणणे हे कलम लावले गेले आहे अशी माहिती समोर आली आहे