श्रीरामपूर मध्ये दिव्यांग व्यक्तीचे पालकत्व परिसंवादाचे आयोजन. . वंचित व दिव्यांग व्यक्तीला न्याय मिळवून देणार आमदार लहू कानडे यांचे प्रतिपादन
श्रीरामपूर :
श्रीरामपूरमध्ये दिव्यांग व्यक्तीचे पालकत्व या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.सेवेसाठी लोकसेवक यांची नियुक्ती शासनाने केली असताना सर्वसामान्य माणसाला लोकसेवकांच्या ऑफिसमध्ये जाताना भिती वाटत असते. प्रशासनाच्या कामामध्ये पारदर्शकता असणे गरजेचे असते. दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाज विभूतींनी दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी नेहमी जागरूक असले पाहिजे. जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने तालुका पातळीवर सातत्यपूर्ण दिव्यांग व्यक्ती करिता ऑनलाईन प्रमाणपत्र तपासणी व वाटप नियोजन करणे आवश्यक असताना लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व संघटना पदाधिकारी यांना मागणी करावी लागते हिच मोठी शोकांतिका आहे. दिव्यांगाच्या विविध प्रश्नांवर आम्ही संजय साळवे सर आपल्या सोबत आहोत. श्रीरामपूर येथे उप जिल्हा रुग्णालय होण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मागणी केली आणि त्याची पुर्तता देखील करण्यात आली आज शंभर खाटांचे सुसज्ज असे रूग्णालय कार्यरत आहे. सर्वसामान्य, उपेक्षित, वंचित व दिव्यांग माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे व असणार आहे. असे प्रतिपादन दिव्यांग व्यक्तीचे पालकत्व परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी आ.लहुजी कानडे यांनी केले.
रोटरी क्लब श्रीरामपूर, मूकबधिर विद्यालय श्रीरामपूर, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग अहमदनगर, इंडियन मेडिकल असोसिएशन श्रीरामपूर, अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुजराथी मंगल कार्यालय यांठिकणी दिव्यांग व्यक्तीचे पालकत्व परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष ऋषिकेश बनकर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी दिव्यांग व्यक्तीचे 21 प्रकार व दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या संदर्भात सविस्तर विवेचन केले. कोरोना कालावधी पूर्वी सन 2018 मध्ये श्रीरामपूरचे तत्कालीन तहसीलदार मा. सुभाष दळवी यांच्या कडे आसान दिव्यांग संघटना पदाधिकारी यांनी केलेल्या मागणीनुसार श्रीरामपूर येथे ग्रामीण रुग्णालय यांठिकाणी महिन्यातील दर गुरुवारी दिव्यांग व्यक्तीची वैद्यकीय तपासणी व ऑनलाईन प्रमाणपत्र वाटप सुविधा सुरू करण्यात आली होती. परंतू कोराना कालावधी मध्ये खंड पडला आणि आता तर ती सुविधा जिल्हा रुग्णालय अहमदनगर कडून पुर्णतः बंद करण्यात आली. ती शासनाने पुर्ववत सुरु करावी अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी परिसंवाद मध्ये मुंबई नानावटी रुग्णालयाचे कॅन्सर सर्जन डॉ. संजय दुधाट, नाशिक येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोनानीस, श्रीरामपूरचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ सुनिल उंडे, बालरोग तज्ज्ञ डॉ भूषण देव, समुपदेशक पुजा नगरकर यांनी उपस्थित दिव्यांग व्यक्ती व पालक यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या विविध प्रकारच्या समस्यांवर सविस्तर विवेचन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीरामपूर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चेतन भुतडा यांनी केले. मान्यवरांचे स्वागत रोटरी क्लबचे अध्यक्ष ऋषिकेश बनकर व डॉ. राम कुकरेजा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांनी केले तर आभार मूकबधिर विद्यालाचे मुख्याध्यापक संतोष यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रविंद्र कुटे, डॉ. प्रशांत चव्हाण, डॉ. केतन बधे, डॉ योगेश गाडेकर, डॉ राजेंद्र चौधरी, अभिजीत मुळे, अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड,श्रीरामपूर मूकबधिर विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले